नवीन लेखन...

निरंजन – भाग १२ – क्षमाभाव

क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.

पश्चाताप म्हणजे मनातल्या मनात झालेल्या नुकसानाबद्दल वाटणारी खंत….मग ते नुकसान एखाद्या नात्यात असो किंवा एखाद्याच्या मनातील भावनांचे, तर कधी एखाद्या वस्तूचे नुकसान असो, नुकसान हे शेवटी नुकसानच असते. मग ते लहान असो किंवा मोठे…

“सॉरी…, मला माफ करा, मला क्षमा करा, माझं चुकलं”, असं बरंच काही आपण चुकी झाल्यावर बोलतो. पण ते बोलताना आपल्या मनापासून तसे भावदेखील प्रकट झाले पाहिजेत. तरच त्या शब्दांना मूल्य असते. नाहीतर नुसते एखाद्याच्या मनाचे समाधान होण्यासाठी, किंवा एखाद्याचे जास्त ऐकुन घेण्याची सवय नसल्यास, तर कधी भितीने, तर कधी स्वतःहून स्वतःच्या मनावर दडपण आणून क्षमा मागणे, अर्थहीन ठरते आणि अशा क्षमेला उत्तरही कधीच समाधानकारक मिळत नाही.

क्षमेमध्ये कधीही अहंकार नसावा. क्षमा करण्याची क्षमताही तितकीच मोठी असते. एखाद्याला माफ करण्यासाठी त्याच्या भावनांना समजुन घेणे, त्याच्या चुकीला सखोल समजून घेणे आणि क्षमा करणे, हे मोठ्या मनाचे लक्षण असते फक्त सबल मनाची व्यक्तीच हे करू शकते. कारण सबल मनाची व्यक्ती आपल्यामध्ये सहनशक्ती आणि संवेदनक्षमता बाळगते. शांतता बाळगते.

पण हे ही तितकेच सत्य कि, क्षमा ही तेव्हाच योग्य असते जेव्हा चुक ही जाणून-बुजून नाही, तर नकळत घडते. मुद्दामहुन केलेली चूक ही चुक नाही, तर कुटिलता असते, अपराध असतो आणि तिथे दंड हा योग्यच.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..