एक ऋण असेही..

कोव्हिड १९ विरोधात झुंज देणार्‍या आपल्या दररोजच्या नायकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त  करण्यासाठी आज मी एक इंर्टन डॉक्टर पुढाकार घेत आहे …

हे तुम्हा सर्वांसाठी ….. आपण दररोज आणि विशेषत: या साथीच्या आजारा दरम्यान देत असलेल्या त्यागांसाठी आहे. आपले समर्पण, वचनबद्धता आणि धैर्य आमच्या मनापासून कृतज्ञता आणि कौतुक करण्यास पात्र आहेत. आपण केलेली रूग्णांची सेवा असंख्य जीव वाचवित आहे आणि हजारो बदल घडवत आहे. ….


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

देशभरात बरेच डॉक्टर, परिचारिका, इंटर्न्स, एमएसडब्ल्यू, तंत्रज्ञ, ट्रान्सपोर्टर्स, ईएमटी, फार्मासिस्ट आणि प्रत्येकजण जे रुग्णांच्या काळजीचे समर्थन करतात असे योद्धे स्वतः निस्वार्थी भावनेने पुढे येऊन आपल्या अतिसंवेदनशील लोकसंख्येची काळजी घेत आहेत आणि कोविड १९ या  साथीच्या रोगाचा लढा देत आहेत आणि त्यांचे योगदान देत आहेत …

महिनाभरापूर्वी जेव्हा कोविड -१९  तथाकथित कोरोनाने भारतात आपली मुले रुजवायला सुरू केली तेंव्हा
सगळ्यांना याची भीती होती आणि जीवाची काळजी वाटत होती आणि हो … त्यामध्ये मी देखील होते.. एके दिवशी ती अशा संध्याकाळी मला पीएसएम डिपार्टमेंट कडून जोईनिंग ऑर्डर मिळाली आणि त्यामध्ये असे लिहिलेले शब्द होते,

      ‘आपणास कोव्हिड-ओपीडीमध्ये पोस्ट केले आहे’.

आणि माझ्यासारख्या नवीन शिकावू डॉक्टरची बत्तीच गुल झाली . माझे घरचे आणि मी स्वतः खूप घाबरलेले होते आणि तिथे काम करण्याची तयारी तर अजिबातच नव्हती. मी एम बी बी एस पास होवून  आत्ता कुठे काही महिन्यांपूर्वी माझ्या कामाला सुरवात केलेली आहे. अनुभव मात्र काहीच नव्हता आणि करिअर च्या  सुरवातीलाच मात्र हे कोरोनाचे संकट धावून आले. मनात बरचं काही चालल होत….

सर्व प्रकारचे नाटक करून ड्यूटी टाळायचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर, मी २९-०४-२०२० रोजी ओपीडी जॉईन केली.
आणि त्याच ठिकाणी  माझे घड्याळ  ८ वाजता सकाळी सुरू व्हायचे.  दरम्यानच्या काळात लोक आगामी युद्धासाठी आपली शस्त्रे धारदार करीत होते आणि इकडे मात्र वेगळेच संकट जगावर ओढवून आले …

आम्ही डॉक्टर कोरोना स्क्रीनिंगसाठी नेमलेले कर्तव्य बजावत असताना आम्ही घाबरून गेलो होतो आणि आजूबाजूचे प्रत्येकजण असा विचार करीत होते  परंतु हळू हळू आम्ही सगळे जीवाची पर्वा सोडून पूर्णपणे या कामामध्ये गुंतून गेलो आणि  अखेरीस प्रत्येकाला हे समजले की आमचा छोटासा प्रयत्न या साथीच्या आजारात लोकांना कशी मदत करू शकतो..

प्रथम प्रत्येकजण घाबरला होता आणि प्रत्येकजण अधिक असुरक्षित कुटुंबातील सदस्यांबद्दल काळजी करीत होता परंतु भीतीची जाणीव आपल्या क्षमतेच्या बाजूला ठेवून केली गेली आहे, तर आपण हे विसरू नये की आम्ही देखील काळजी देण्याची शपथ घेतली आहे. .. या लढाईत अनेक आरोग्यसेवा कर्मचारी भारी किंमत मोजत आहेत ..

आमचे वरिष्ठ, रहिवासी, मित्र, परिचारिका, एमएसडब्ल्यू, आमचे साफसफाई करणारे कर्मचारी आणि मामा, मावशी, अंगरक्षक, आमच्या कर्मचार्‍यांसह रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी लढायला  सज्ज आहेत आणि आता आम्ही म्हणतो की  “ सध्स्थितीत हे युद्धाच्या वेळी सैन्यात असण्यासारखे आहे. आपणच हे करणारे आहोत आणि आपल्याला हे करावं लागणारच आहे!! आपण नाहीतर हे करणार तरी कोण ? आता कशाची पर्वा नाही …आता फक्त लढ म्हणायचं….. यासाठी प्रयत्न करावे लागतील, पण ते करायला हवे “

कोविड १९ च्या विरोधात लढा देणारे आणि  अथक परिश्रम घेऊन,  मोठ्या मनाने समर्पणपूर्वक कार्य करत असताना कोरोनाचा पराभव होऊ शकतो असा एक विश्वास दृढ करणारे आपले योद्धे यांचे खूप खूप धन्यवाद ! सुरक्षित आणि कोरोना पासून सर्व सुरक्षित राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! ..

कोरोना योद्धयांच्या धैर्याला आणि उर्जेला सलाम ….

— डॉ. धनश्री धोंडीबा हासे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..