नवीन लेखन...

निरंजन – भाग ३० – माता कात्यायनी

माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे.

महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

एकेकाळी महर्षी कात्यायन यांनी माता भगवती पार्वती मातेचे ध्यान केले होते. त्यांच्या ध्यानावर प्रसन्न होऊन मातेने त्यांना वरदान मागण्यास सांगितला होता तेव्हा त्यावेळी महर्षी कात्यायन यांनी मातेला आपल्या घरी कन्या रुपाने येऊन सहवास करण्याची प्रार्थना केली. महर्षी कात्यायन यांच्या ध्यानाचे फळ म्हणून मातेने आशिर्वाद स्वरुपात त्यांच्या घरी सहवास केला. महिषासुराचा वध जवळ आलेला होता.

महर्षीं कात्यायन यांच्या घरी मिळालेले ममत्व आणि माया सोडून आपल्या योजनेला परिणाम देण्यासाठी माता जेव्हा निघत होत्या तेव्हा महर्षींच्या सेवाभावाने त्या अतिशय प्रसन्न होत्या. आशीर्वाद स्वरुपात महर्षी कात्यायन यांना माता म्हणतात, “अखंड सृष्टीमध्ये माझा अवतार तुमच्या नावाने म्हणजेच कात्यायन महर्षींची कन्या कात्यायनी म्हणून प्रसिद्ध राहील”.

— स्वाती पवार  

Avatar
About स्वाती पवार 39 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "ॐश्री" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..