नवीन लेखन...

निरंजन – भाग १५ – विटंबना

एखाद्याची विटंबना करुन कधी कधी एखाद्याला खुप आनंद मिळत असतो. आणि आपल्या सर्वांना हा काही न घेतल्यासारखा अनुभव नाही किंवा अपरिचीत गोष्ट नाही. कधी काळी आपणही याला पात्र ठरलेले असतो. बराचश्या घटना आजुबाजुला घडत असतात. मित्र्-मैत्रिणिंमध्ये, शेजारी-पाजारी, ऑफिसमधल्या वातावरणात, प्रवासामध्ये तर कधी आपल्याच आप्तजनांमध्ये…एखाद्या व्यक्तीची गंमत करताना, आपण गंमत केलेल्या त्या गंमतीमध्ये, जेव्हा समोरची व्यक्तीदेखील दिलखुलास हसते, तिथपर्यंतच ती गंमत असते. पण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावुन आजुबाजुची चार माणसे हसतात, तेव्हा मात्र ती गंमत उरत नाही. त्याला विटंबना म्हणतात.  

अशीच एक घटना एकदा प्रवासामध्ये घडली.

आगगाडीतून प्रवास करीत असताना एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वतःच्या ज्ञानावर गर्व बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळाने त्या शेतकऱ्यांची थट्टा करून आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. लोकही फार आनंद घेऊ लागली.

थोडावेळ ती थट्टामस्करी निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, “साहेब, किती काही झालं तरी मी अडाणी माणूस आणि तुम्ही शिकलेली माणसं, तरीसुद्धा आपल्या गाडीतला वेळ चांगला जावा म्हणून आपण थोडा विरंगुळा करु, एकमेकांना कोडी घालूया, आणि जो उत्तर बरोबर देईल तो ही पैज जिंकेल, “मी अडाणी गरीब असल्या कारणाने, जर कोडी सोडवण्यात मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये देईन पण जर तुम्ही हरलात तर तुम्ही मला मात्र पंचवीस रुपये द्यायचे”, आहे का कबुल?” हे ऐकून प्राध्यापक आनंदित झाला आणि अवतीभोवतीच्या सहप्रवाशांवर छाप मारायला ही संधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे, असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला, “हो तुझी कल्पना मला मान्य आहे, पहिली संधी मी तुला देतो, पहिलं कोडं तू मला घाल,” शेतकऱ्याने लगेचच आपलं कोड विचारलं, “ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एकच पाय असतो, असा पक्षी कोणता?” प्राध्यापकाने खूप विचार केला, बराच वेळ झाला, पण त्याला काही उत्तर देता आलं नाही, तो काहीसा ओशाळुन म्हणाला, “बाबा रे, मी हरलो, हे घे माझे पंचवीस रुपये आणि आता याच कोड्याचे उत्तर तू मला सांग”. प्राध्यापकांना दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी विस रुपये स्वतःच्या खिशात टाकून उरलेले पाच रुपये प्राध्यापकाच्या हाती देऊन शेतकरी म्हणाला,” मला सुद्धा या कोड्याचे उत्तर देता येत नाही म्हणून मी सुद्धा हरलो, त्याचेच हे पाच रुपये मी तुम्हाला देत आहे. प्राध्यापक थोडावेळ निशब्द झाला. यावर काय बोलावे हे त्याला जराही सुचले नाही. अशा प्रकारे एका शेतकर्‍याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकन उठून तिथून निघून गेला आणि दुसर्‍या डब्यात जाऊन बसला. कधी कधी दुसर्‍याची विटंबना करता करता आपलीच फजिती होऊन जाते.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..