नवीन लेखन...

निरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती

|| ॐ श्री ब्रह्मदेवता नमो नम: ||

ग्रहण ……
ग्रहण होणे म्हणजे आकलन होणे, आत्मसात होणे.

आपल्यामध्ये एखादे काहीतरी गच्च अशा स्वरूपात बंदिस्त होणे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादे ज्ञान, एखादा प्रसंग, एखादे वातावरण आपल्यामध्ये Recording होणे. म्हणजेच ग्रहण होणे. पण ही Recording दोन प्रकारांनी होते, एक म्हणजे  आपल्या मनामध्ये ग्रहण होणे आणि दुसरी म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ग्रहण होणे.

जेव्हा एखादे काहिसे आपल्या मनामध्ये ग्रहण होते तेव्हा ती गोष्ट, तो प्रसंग, ते वातावरण, त्या सर्व घटना आणि मिळविलेले ज्ञान हे आपण जन्मोजन्म घेऊन जातो. पण याच सर्व गोष्टी जेव्हा आपल्या मेंदूमध्ये ग्रहण होतात तेव्हा मात्र त्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असुन तात्पुरत्या वेळेसाठीच आठवणीत राहतात.

आपण आपल्या लहानपणीचेच एक साधं उदाहरण घेऊया, लहानपणी जेव्हा अभ्यासाला आपण बसायचो तेव्हा आपली आई आपल्याला नेहमी सांगायची “अरे मन लावून अभ्यास कर” कधीकधी आपल्या घरातील वडिलधारी व्यक्तीही म्हणत असे “अरे मन लावून काम कर”, म्हणजेच एखादे काम जर आपण मन लावून केले तर नक्कीच आपल्याला ते ग्रहण होणार असा तो संकेत असायचा.

मनात ग्रहण होते म्हणजे नेमके काय आणि कसे? यावर अध्यात्मावरील एक लहानशी कथा …..
माता कुंतीचे पाच पुत्र होते, वडिलांचे नाव पंडु असल्यामुळे त्या पाचही पुत्रांना पांडव असे म्हणत. या पाच पांडवामध्ये अर्जुन हा एकमेव श्रेष्ठ धनुर्धारी होता. हे पाचही पुत्र युद्धविद्येमध्ये पारंगत होते. पण अर्जुनाला मात्र चक्रव्यूहाचा देखील अभ्यास होता. एकदा असच महालामध्ये सुभद्रे सोबत संवाद साधत असताना युद्धविद्येबद्द्ल विषय रंगला आणि सुभद्रेने अर्जुनाला चक्रव्यूहाबद्द्ल प्रश्न केला… सुभद्रा याप्रसंगी गरोदर होत्या. अर्जुनाने सुभद्रेला चक्रव्यूहाचे सर्व फेरे कसे सोडवत जातात हे टप्प्याट्प्प्याने सांगितले पण हे अगदी सुंदर पद्धतीने सांगत असताना शेवटचा फेरा मात्र न ऐकताच सुभद्रा झोपी जाते.
पण या चक्रव्यूहाचे रहस्य सुभद्रेसोबत अजुन एक ऐकत असते ते म्हणजे तिचे बाळ अभिमन्यू….  चक्रव्यूहाचा फक्त शेवटचा फेरा सोडुन बाकीचे सर्व फेरे कसे सोडवायचे याचं ज्ञान पुत्र अभिमन्यूच्या मनात आईच्या उदरी असतानाच ग्रहण झाले होते. फक्त शेवटच्या फेऱ्याचे रहस्य मात्र माता सुभद्रा झोपी गेल्यामुळे तिचे मन हे शरिरामधुन निघून जाते. सुभद्रेच्या मनाची जागृत अवस्था नसते आणि ते रहस्य ग्रहण व्हायचे राहुन गेले…म्हणून आजही अभिमन्यूचे नाव शुरवीर योद्धा म्हणूनच संबोधले जाते. ही आहे मनाची ग्रहण शक्ती…. अभिमन्यूला चक्रव्यूहाचे ज्ञान हे मनात ग्रहण झाले होते जे त्याने योग्य वेळी उपयोगात आणले.

आता पाहुया मेंदुत ग्रहण होते म्हणजे नेमके काय आणि कसे? यावर मानवी बोधकथा …..

एकदा एका व्यापाऱ्याने आपल्या व्यवसायाकरिता पाच गाढव विकत घेतले होते. आणि आपल्या व्यवसायाकरिता तो गावागावातून त्यांना घेउन हिंडत असे. कधी कधी गरज लागली तर तो प्रवासातच एखाद्या गावी वास्तव्य करी आणि सोबत असलेल्या त्य गाढवांना एखाद्या जवळपास असलेल्या झाडाच्या खोडाला बांधुन ठेवी. त्यांना लागणारे जेम तेम पाच मिटर इतके दोरखंड व्यापारी सतत प्रवासामध्ये आपल्या सोबत बाळगत असे. नेहमीप्रमाणे त्याचा हा दिनक्रम असा चालुच होता. काही दिवसांतच व्यापार वाढू लागला. म्हणून वाढत्या व्यापारामुळे व्यापाऱ्याने ठरवले कि आपण अजुन एखादे गाढव विकत घ्यावे आणि त्याप्रमाणे त्याने ते विकतही घेतले. आता मात्र व्यापाऱ्याजवळ एकुण सहा गाढव झालेत. एकेवेळी असाच प्रवास करता करता तिन्हीसांजेची वेळ झाली आणि व्यापाऱ्याने त्या रात्री त्याच गावी मुक्काम करण्याचे ठरवले. रात्र होण्याआधीच व्यापाऱ्याने स्वत:ची आरामाची व्यवस्था केली. आणि बरोबर आणलेली गाढवे तो नेहमीप्रमाणे जवळपास असलेल्या झाडाला बांधायला जातो. पण स्वभावात कंजूषपणा असल्यामुळे त्याने दोरखंड मात्र तोच आणला होता जो पूर्वी तो गाढवांना बांधण्यासाठी वापरत असे. पाच गाढवांना बांधुन झाल्यानंतर दोरखंडाचा शेवटचा तुकडा राहतो जो सहाव्या गाढवाला बांधण्यासाठी अपुरा पडतो. म्हणून पुन्हा व्यापारी हाच दोरखंड सोडुन त्यांना पुन्हा बांधायला सुरुवात करतो. आणि पुन्हा तेच घडते. टो दोरखंड त्यांना पुन्हा अपुराच पडतो. असे करता करता अचानक त्या व्यापाऱ्याची नजर बाजुने जाणाऱ्या आणि एक विलोभनीय तेज असणाऱ्या ऋषीमुनींवर जाते. व्यापारी क्षणभर त्यांच्याकडे एकटक पाहतच राहतो. पण त्याची हाक ऐकून थांबलेले ऋषीमुनी त्याला भानावर आणतात.

व्यापारी ऋषीमुनींशी संवाद साधायला लागतो आणि झालेली सर्व घटना संपूर्ण कथित करतो. यावर ऋषीमुनी त्याची मदत करायला पुढे होतात. ते म्हणतात, महाशय दोरखंड माझ्या हातात द्या. पुन्हा एकदा मी प्रयत्न करुन पाहतो. व्यापारी दोरखंड त्यांच्या हातात देतो. याआधी व्यापारी जेव्हा दोरखंड बांधत असतो तेव्हा ते पाचही गाढव रांगेत उभे असतात आणि सोडत असताना देखिल ते तिथेच असतात. पण सहावे गाढव मात्र त्यांच्याकडे चेहरा करुन घडलेली सारी घटना शांतपणे बघत असतं. पण आता जेव्हा दोरखंड ॠषीमुनींच्या हाती असते तेव्हाही गाढवांची उभं राहण्याची स्थिती हे पुर्वीप्रमाणेच असते. ऋषीमुनी आपला प्रयत्न सुरु करतात आणि एका मागोमाग एक करुन पाचही गाढवांना बांधत जातात. पण जे आधी होते तेच पुन्हा घडते.  म्हणुन ऋषीमुनी एक युक्ती सुचवतात. सहाव्या गाढवाला बाकीच्या पाच ही गाढवांच्या समोर उभं करुन त्याला इतर गाढवांना बांधलेला दोरखंड दिसावा अशी क्रिया करुन पाचही गाढवांना तो दोरखंड बांधत जातात. आणि सर्वात शेवटी सहाव्या गाढवाला देखील त्या पाच गाढवांच्या बरोबरीने उभं करतात. उरलेला तुकडा सहाव्या गाढवाच्या नजरेत आणतात आणि त्याच्या पायाला स्पर्श करुन त्यालाही या रांगेत बांधलं जात आहे असा फक्त अभिनय करतात. असं केल्यामुळे सहाव्या गाढवाची स्वतःचीच समजुन होते के इतरांप्रमाणे आपल्यालाही बांधण्यात आलेले आहे. हा सर्व प्रकार व्यापारी पाहतच राहतो. पण ऋषीमुनी व्यापाराला बजावतात की व्यापार्‍याने कोणतीही चिंता न करता झोपी जावे. सहावे गाढव कुठेही जाणार नाही. याचीही ते व्यापार्‍याला श्वाश्वती देतात.

रात्र निघुन जाते. सकाळ होताच व्यापारी अंगणात येतो. आणि आपली नजर त्या गाढवांवर टाकतो, पाहतो तर काय, सहाच्या सहा गाढव आपापल्या जागी स्थिर असतात. म्हणजेच इथे आपल्याला काय समजुन येते की त्या सहाव्या गाढवाच्या मेंदुत एक रेकॉर्डिग होते. त्याला त्याच्या समोर असलेल्या इतर गाढवांसोबत केलेली क्रिया आपल्यासोबतही झाली आहे असे ग्रहण होते. म्ह्ण्जेच वर्तमानातल्या, भविष्यातल्या बर्‍याचश्या क्रिया ह्या आपल्यात काय ग्रहण झालय आणि आपण काय ग्रहण केलय यावर ही अवलंबुन असतात.

असेच एकदा व्यापारी आपल्यासोबत गाढवांच्या जागी घोडयांना घेऊन जात असतो. पुन्हा सहा घोडयांना बांधण्यासाठी स्वतःच्या कंजुस स्वभावामुळे त्याने तोच दोरखंड आपल्यासोबत आणलेला असतो.

रात्री प्रवासामध्ये ऋषीमुनींनी केलेल्याच युक्तीचा तो पुन्हा यावेळेही उपयोग करतो. पण इथे गाढव नसतात तर घोडे असतात. युक्ती अमलात आणुन व्यापारी परिपुर्ण चिंता मुक्त होऊन गाढ झोपी जातो. आणि सकाळ होताच उठल्यावर पाहतो तर काय, तो सहावा घोडा हा रात्रीच पळुन गेलेला असतो. कारण घोड्याच्या त्यावेळी मनात ग्रहण केलेले असते. म्हणुन सत्य काय आहे याची त्याला परिपुर्ण जाणीव असते. त्याला हे ठाम माहित असते कि आपण स्वतंत्रच आहोत. तर याउलट गाढवाने हिच क्रिया मेंदुत ग्रहण केलेली असते म्हणुन गाढवाची स्वतःचीच समजुन होते के इतरांप्रमाणे आपल्यालाही बांधण्यात आलेले आहे, इतर गाढवांसोबत केलेली क्रिया आपल्यासोबतही झाली आहे. अशा विचाराने ते गाढव सत्यापासुन अपरिचीत राहते.

यावरुन आपल्याला नक्कीच लक्षात आले असेल की मनाची ग्रहण शक्ती ही जीवनात कीती महत्त्वाची आहे….

पण मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे.

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..