नवीन लेखन...

निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो

आपल्या मनामध्ये सतत एक विचारधारा कायम स्वरूपी सुरू असते आणि त्यात वेगवेगळे विचार असतात कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक.

सकारात्मक विचार म्हणजे सद्विचार, ज्यामुळे आपले चरित्र सुंदर बनते. व्यक्तिमत्व सुंदर घडते. मनामध्ये असलेल्या चांगल्या विचारांचा ठेवा सदैव आपल्या आचरणाला एक वेगळी वाट मिळवून देतो. आपलं आचरण हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. दिवसभरात केलेल्या विचारांवरच आपली कृती अवलंबून असते आणि त्यावरच आपलं आचरण अवलंबून असतं पण या चांगल्या विचारांचा ठेवा निरंतर आपल्या सोबत राहत नाही. बरेचसे असे प्रसंग दिवसभरात घडतात ज्यामुळे आपल्या विचारांची वाटचाल एक वेगळे वळण घेते आणि विचारांची जुळून आलेली शृंखला क्षणात खंडित होते. हा खंड क्षणात विस्कळीत करतो आपल्या विचारांना.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

हे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला सोडत नाहीत. म्हणूनच सद्विचार हा थोर सोडू नये तो… कारण सदविचारच आनंदाला प्रत्यक्षात आपल्या जीवनात कसे आणायचे ते शिकवतात.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 32 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "ॐश्री" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..