नवीन लेखन...

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा बिचारा स्थिर राहूनी लपतां […]

सखू ग सखू

सखू ग सखू, कुठं चाललीस? बाजारात जाते, बाजारहाट करते भाजीपाला आणते,फळबिळं आणते अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते सखू ग सखू, कुठं चाललीस? पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते गंध पावडर आणते,फणीबिनी बघते साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते सखू ग सखू, कुठं चाललीस ? दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते दवापाणी घेते, डिकमली बघते गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते सखू ग सखू, कुठं […]

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।।   झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला […]

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।। जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।। ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।। बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो […]

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे,  आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो,  साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती,  त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई,  कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे,  सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे ,  मागे […]

नाभिकेंद्रांत आत्मा

आत्मा कोठे असतो,     नाभी केंद्रात शोधाल का ? तो तर दिसत नसे,     मग त्यास जाणाल का ?….१, सर्व इंद्रिये वापरली,     परि न झाला बोध, कोठे लपला आहे,    न लागे कुणा शोध….२, विचार आणि भावना,     संबंध त्याचा ज्ञानाशी मेंदूत आहे इंद्रिय,    संपर्क त्यांचा सर्वांशी….३, मेंदूवरी ताबा असे,    नाभीतील मध्य बिंदूचा समजून घ्या सारे,    तेथेच आत्मा देहाचा…४, मातेचे […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या,  काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,  स्वप्न रंगविले कालीदासाचे….१, कॉलेजातील रंगमंचावरी,  तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२, जमले होते शंभर श्रोते,  भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,  गांधी नेहरूसम होवूं वाटले…३, यश जेंव्हां पदरी पडते,  भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,  करीत […]

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।। जीवन मार्ग सरळ असता,  फेरे पडती नशीबाचे  । अनेक वाटा दिसून येता,  भटकणे मग होई जीवाचे  ।। विसरूनी जातो मार्ग आपला,  तंद्रीमध्ये भटकत असता  । बोलफूकाचे देत राही,  नशीब दैव म्हणता म्हणता  ।। असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची […]

सहचारीणी

दिपूनी गेले नयन त्या क्षणी, बघता तिची सोज्वळ मूर्ती । हाक निघाली अंतःकरणीं, तुझ्याचसाठी निर्मिली कृती ।।१।।   जरी बघितल्या अनेक सुंदरी, ठाव मनाचे हिने जिंकले । सहचारीणी ही होईल तुझी, अंतरमनी शब्द उमटले  ।।२।।   अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी, ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।३।।   […]

1 271 272 273 274 275 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..