वेदना
जाणता वेदना जगातील मम वेदनाही विरुन गेली पाहता दुःख या जगीची मम वेदनेलाही शरम आली । होतो कवटाळून मी बसलो लहानशी वेदनाही फक्त माझी वेदना माझ्यहून किती कठोर जगी आहे कुणी भोगलेली । प्रत्येकाचे आहे दुःख वेगळे आहे वेदनाही हर एक निराळी पाहूनी तु सोसलेल्या वेदना खरी वेदना मजला कळाली । — सुरेश काळे मो.9860307752 सातारा. […]
