चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या,  काव्य वाचन केले त्याचे

रसिक जनाची स्तुति ऐकूनी,  स्वप्न रंगविले कालीदासाचे….१,

कॉलेजातील रंगमंचावरी,  तल्लीन होवूनी भूमिका केली

टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२,

जमले होते शंभर श्रोते,  भाषण ज्यांचे समोर केले

श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,  गांधी नेहरूसम होवूं वाटले…३,

यश जेंव्हां पदरी पडते,  भारावूनी जातो आम्ही त्यावेळी

कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,  करीत राहतो चूक सगळी…४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1384 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…