भिकाऱ्याचे पुण्य

रखरखत्या उन्हांत बसूनी, भीक मागतो एक भिकारी, जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी ।।१।। नजीक येत्या वाटसरूंना, आशीर्वाद तो देत असे, ‘प्रभू तुमचे भले करील’ हेच शब्द उमटत असे ।।२।। अन्न न घेता दिवस जाई, खात भाकरी एकच वेळां, दिवसभरीचे श्रम होऊनी, उपवास सदैव घडला ।।३।। पूर्व जन्मीच्या कर्मफळाने, दीनवाणी जीवन मिळाले, आज पुण्याच्या राशि […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या,  काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,  स्वप्न रंगविले कालीदासाचे….१, कॉलेजातील रंगमंचावरी,  तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२, जमले होते शंभर श्रोते,  भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,  गांधी नेहरूसम होवूं वाटले…३, यश जेंव्हां पदरी पडते,  भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,  करीत […]

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी, जड तुझीच पारडी ।।१।।   पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।   बलीदानाची तू मूर्ती, ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।।   सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, […]

सहचारीणी

दिपूनी गेले नयन त्या क्षणी, बघता तिची सोज्वळ मूर्ती । हाक निघाली अंतःकरणीं, तुझ्याचसाठी निर्मिली कृती ।।१।।   जरी बघितल्या अनेक सुंदरी, ठाव मनाचे हिने जिंकले । सहचारीणी ही होईल तुझी, अंतरमनी शब्द उमटले  ।।२।।   अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी, ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।३।।   […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी, विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी, उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या […]

आत्मविश्वास

जे जे मजला हवेच होते, मिळवित गेलो यत्न करूनी, चालत असता जेव्हा पडलो, उठलो होतो धीर धरूनी ।।१।। आतंरिक ती शक्ती माझी, पुन्हा पुन्हा तो मार्ग दाखवी, शरिराला ती जोम देवूनी, वाटेवरती चालत ठेवी ।।२।। निराश मन हे कंपीत राही, विश्वालासा तडे देवूनी, दु:ख भावना उचंबळता, देह जाई तेथे हादरूनी ।।३।। परि विवेक हा जागृत होता, […]

देह देव

हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।।   प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।।   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

संत संगती

ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले, संत जाणती दिव्य दृष्टीने, नियतीच्या ह्या हलचालींना, दिली जाती आवाहने ।।१।।   जाणून घेता भविष्यवाणी, जीवन मार्ग हे ज्यांना कळती, तपशक्तीने संत महात्मे, योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।   कर्माने जरी भाग्य ठरते, सुख दुखःच्या गुंत्या भोवती, त्या गुंत्यातील धागा शोधूनी, सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।   कृपा होता संत […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर […]

प्रेम झरा

प्रेम झरा नाही गेली अटूनी माया, आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी, न होशील मज पारखी ।।१।।   वाहत असता फुटले फाटे, जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा, नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।   कसा राहील ‘साठा’ आता, मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी, ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।   कुणीतरी […]

1 2 3 12