नवीन लेखन...

ही माझी शाळा

आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।। आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।। शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।३।। कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर   देई बांधून सर्वा घर […]

बहिणीची हाक

राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।। आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।। प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।। अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते बघ मी, दिसत  नाही […]

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।। पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।। जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।। अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या […]

आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी, बघण्याची मज ओढ लागली, फुलूनी गेली बाग कशी ही, बीजे जयांची तूच पेरीली ।।१।। कल्पकता ही अंगी असूनी, दूरद्दष्टीचा लाभ वसे, अंधारातील दुःखी जनांची, चाहूल तुज झाली असे ।।२।। शीतल करुनी दुःख तयांचे, जगण्याचा तो मार्ग दाखविला, सोडूनी सारे वाटेवरी, आकस्मित तू निघूनी गेला ।।३।। आस्तित्वाची चाहूल येते, आज इथे केंव्हातरी, […]

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।। सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।। दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।। दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं […]

दृष्टांताची किमया

निराकार तो असूनी व्यापतो, सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो, करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।   दर्शन देण्यास भक्त जणांना, धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या, ध्यास लागता खूप ।।२।।   दृष्टांत होणे सत्य घटना ती, जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे, सदैव स्वप्न पडे ।।३।।   कुणामध्येही अस्तित्व दाखवी, हीच त्याची किमया, परि टिपून […]

कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची, कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही, भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।। कुणासी म्हणावे ज्ञानी, रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती, सर्व सामान्य मंडळी ।।२।। कोठे शिकला ज्ञानोबा, तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे, अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।। जिव्हेंवरी शारदा, जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी, कवितेचा जन्म होई….४ भाव शब्दांचा सुगंधी हार, माझी […]

निवृत्तीची वृती

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।।   बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।।   कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।   संसार […]

सद्‌गुरु

  भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।   मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।।   अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।   वाट दाखवी सद्‌गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो […]

दर्पण

चित्र दिसते दर्पणी , जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी, अस्पष्ट ते होतसे ।।१।।   दर्पणा परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी ।।२।।   निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या  त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

1 2 3 4 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..