नवीन लेखन...

प्रेमाचा निर्मळ झरा

शब्दांच्या मायावी सागरात मुक्त पणे विहरावे… उपहासाच्या लाटांना हलकेच शिताफीने चुकवावे अंतर्मनी विश्वासाचा रहावा कायम खोलावा विरहाचा खोल भोवरा… अलगद पणे चुकवावा आनंदाच्या तुषारांनी रोमांचित होउन उठावे अपमानाचे ते शिंतोडे… अलगद पुसून काढावे उन्मादाच्या फेसाळ बुडबुड्यास व्यर्थ हवा नाही द्यायची अहंकाराच्या दगडाची ठेच… तटस्थ पणे चुकवायची कौतुकाच्या वर्षावांनी हर खुन बहकुन नाही जायचं वादळी आरोपांच्या कणांनी […]

गीत तुझे माझे

गीत माझेच मी गात असता का लागती ना सूर माझे आज प्रथमच तुझ्याविना मी प्रेमगीत गातोय माझे । मैफीलही तीच आहे सखे रात्रही तशीच आहे परी आज माझ्या सुरांना ना पुर्वीचे ते माधुर्य आहे । गेलीस मजसी सोडून तू शब्दही पोरके करुन माझे कसे रसिकांना मग भावतील ज्यात नाहीत स्वर तुझे । शब्दांना माझ्या सवय होती […]

मातीचा देह मातीला शरण गेला

आजी आजोबा होते थकलेले थकलेल्या वाड्यात रहात होते. काळाने केला भयानक घात सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात पण पडताना वाड्याने हात टेकले आजी आजोबांना त्याने वाचविले जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले आजी मात्र एकटीच राहिली धीराने वाडा नाही सोडला तिनं हट्टाने म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं या तूम्ही सारी असेच दर […]

मतांची पोतडी सत्तेची गोधडी : प्रथम अंक

ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला वाटप-रांगेत धरी जोर चांगला लांगुलचालन करून जोड सांधला संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला अखेरीस कँडिडेट-टिळा लागला धुंदीला नच पारावार राहिला प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला पक्षानें आज खरा पांग फेडला.               १   ‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला ‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला खांद्यावर […]

मनातला कृष्ण…. 

अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यास तो बिचकला मनातल्या अर्जुनाला कृष्ण अजुनही नाही भेटला उगाच खोट्या धर्मापायी निरपराध कोणी मारला अश्वत्थाम्याची ती जखम पुन्हा लागली भळभळायला जाणुन बुजून पाप करून त्यांना पश्चाताप नाही झाला त्यांच्यातला कपटी दुर्योधन आज पुन्हा मोठ्याने हसला शकुनीच्या मनातलं कपट ओळखू नाही शकला मनातला धर्मराज आज मला पुन्हा हतबल दिसला अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यास तो घाबरला […]

गुंतता नयन हे

सांगते मी गुपीत तुला रे सांगू नको तू कुणाकडे नजरेत तुझ्या गुंतता नजर का पाहू मी या जगाकडे । एक शब्द मज  एक ध्यास अशी नजरेत नजर राहू दे जन्मोजन्मी साथ सजणा सदैव अशीच राहू दे । हात तव मज हाती असता अन नजरेत माझ्या नजर तुझी भासते मज जग जिंकीले मी असता मजला साथ तुझी […]

मी प्रेमभाव जागवला

माझ्यातला चांगुलपणा मी पुन्हा जागवला प्रेमभाव अंतरीचा पुन्हा मी जोपासला मनातली वैरभावना ती कशी कावरी-बावरी झाली प्रेमाच्या सानिध्यात फार काळ नाही टिकली खूनशी वृत्ती ती मन पोखरत राहीली चांगुलपणाला घाबरून प्रेमाला शरण आली तिरस्काराचे ते पेटते बाण होते जरी सुटलेले आपुलकीच्या ओलाव्याने आपसुकच ते विझलेले रोषानेही मग आपला रस्ता तेंव्हा बदलला द्वेषालाही अस्तित्वाचा जणु उबग आला […]

मतांची पोतडी सत्तेची गोधडी : अर्जन्सी

( जुन्या काळीं, अर्जन्सी दर्शविण्यासाठी असें लिहीत – ‘जेवत असलात तर हात धुवायला इकडेच या’. त्या आधारानें,  हें काव्य, जरासें खट्याळ ).   तुम्ही तातडीनें इकडे या, अर्जंट या.   जेवत असलात तर हात धुवायच्या आधी इकडे या. अन् मत द्या. पाणी पीत असलात तर फुलपात्रं खाली ठेवण्यांआधी इकडे या. अन् मत द्या. आंघोळ करत असलात […]

अभंग

घरधनी तीचा |भेटण्यां विट्ठला || वारीस निघाला |पंढरीच्या ||१|| घरदार सारं | वावर सोडून || कर्ज गा काढून | तीर्थ करी ||२|| डवरण्या शेत |नाही गडी कोणी || गेला घरधनी | पंढरीसी ||३|| वावरात तीच्या | माजले रे तण || करिते निंदण | एकटी ती ||४|| आभाळ फाटलं | लागली ही झड || झाली पडझड | […]

आठवले मला 

माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.

1 269 270 271 272 273 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..