नवीन लेखन...

एकटी मी

ना भावना, ना कल्लोळ मनी, ना अश्रु, ना हास्य नयनी, ना ध्यास, ना दिशा माहित, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! एक चंद्र , एक तारा, एक एकटा एकांत सारा, एक एकट्या जीवनात माझ्या, ज्योती असूनही काळोख सारा, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! नको सोबत, नको आधार कोणाचा, बस आहे आशिर्वाद माय – […]

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

आपलं माणूस

काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात. त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो ! कर तु तुला हवं ते, ती दणदणीत पाठीवर थाप असते, आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..! काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं, आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..! – श्र्वेता संकपाळ

प्रणय गंध

अंगणात सडा फुलांचा, परी गंध तूझ्या देहाचा, साम्य नाही दोहोंत मुळीच, मला फक्त तू हवा-हवासा! आसुसलेल्या नयन कडांवर, भिरभिरे आता रंगीत वारा, सप्तरंग आकाशी इंद्रधनुचा, नभ धरी डोई वर्षाधारा ! चंद्रबिंब तुझ्यात भासे, सूर्यकिरण उरात दाटे, विरहाचे भोगले मी काटे, संयोगाची ही वेळ वाटे ! बाहुपाशाचा वेढा तनुला, नटखट सुटण्याचा माझा चाळा, कुंतला मुक्त, बटा रुळती […]

रूपवती

वाऱ्यावर झोके घेत,केस उडती धुंद हवेत क्रिडतात जणू पवणाशी ते बटांचे क्रीडादूत अदेत मद्य-मादकता लोचनात धुंद संकेत ते मधुर लालस्य अन हास्य काय करी अभिप्रेत उत्फुल देहावरी स्थिरावले अनामिक नेत्र व्याकुळ कधीचे, झाले तृप्त गात्र नि गात्र लेखणीतून परी कागदावर झिरपली प्रीत मजबुरीने अन राहिले गीत मात्र ओठात – महेश सूर्यवंशी ( पुणे,सासवड)

।। दिवस आणि रात्र ।।

पहाट होते निघून जाते !!  प्रसन्न मन करून जाते उन्हाचा प्रकाश येतो !! सुशोबित दिवस करून जातो।। अंधार येतो !! मनमोकळया पाहुण्यासारखा सुखशांती समृध्दी देउन जातो।। हर तरेचे पक्षी येतात !! वेगवेगळ्या प्रकारचे स्वर कानी पडतात ,म्हणून निसर्गाचे इतिहास घडतात।। कवी सचिन राजाराम जाधव मु.पो:विरवडे दत्तनगर ,ता:कराड,जि:सातारा मो-8459493123

नवरा माझा नवरा आहे

खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा आहे थोडासा तो कोडगा आहे जणु माझा पोरगा आहे कधी तो माझा पप्पा आहे मनातला नाजूक कप्पा आहे थोडासा तो चिडका आहे पण मायेचा झरा आहे खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा आहे लहानांशी त्याची गट्टी आहे थोडासा तो हट्टी आहे त्याला वाटतं तो धाडसी आहे मला वाटतं तो आळशी आहे थोडासा तो हळवा आहे माझ्या जिवनाचा वारा आहे खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,   प्रभूसी मी विनविले  ।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,   काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,   घेण्यास ते समजून  ।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,   बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,   वस्तूच्या त्या गुणापरी  ।। सारे सजिव निर्जिव वस्तू,   गुरू सारखे वाटावे तेच आहेत ईश्वरमय,   तुम्हीच  समजावे  […]

माझी विठू माउली

विठु माऊली तू माझी, माझ्या माय बापाचा कैवारी, साऱ्या जगताला तारी, ना थकले करूनी पायवारी…. रथ तूझ्या संसाराचा, चालवी माझी रखुमाई, तूझ्या सोबतीने ती उभी, सौभाग्याचं लेनं लेवूनी…. तुळशीमाळ हार तुझिया गळा, साऱ्या भक्ता तू लावसी लळा, मी तुझ्या अंतरीचे लेकरु, पिकव रे सोनं माझ्या मळा…. – श्वेता संकपाळ.

आमचे साहित्यिक

पुस्तकांच्या वनात शब्दांचा खजिना शोधतात, कुंचला अन् लेखणीद्वारे पंचरत्न लुटतात, अनुभवाची शिदोरी कव्यरुपी माळेत गुंफतात, म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात ! कईक प्रश्नतर यांच्या गजल व चारोळी नेच सुटतात, छोट्याश्या लेखातून हिरे मोती लखलखतात, पॉलिश करण्यासाठी हे पुन्हा साहित्यच वाचतात, म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात! नकळत मानवी हृदयावर अक्षर रत्नांची झालर घालतात, रोजच्या रटाळ […]

1 267 268 269 270 271 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..