एऽ येश्वदे
एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे बाया बी गोळा करा समद्या मारा समद्यांनला जोरात हाका, आन् ती समदी मेंढरं हाका. चला आपन बहिनी-भाऊ मतदानासाठी जाऊ. देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा. तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका. – सुभाष स. नाईक
