नवीन लेखन...

मुक्या वेदना

प्रेमाच्या जुन्या आठवणीं आता सुन्या झाल्या आहेत अव्यक्त अश्या त्या वेदना आता मुक्या झाल्या आहेत माझ्या सुंदर अश्या जीवनातून तू का गेली ते कळलच नव्हतं तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये मन माझं कधी रमलच नव्हतं अडकलेल्या पाशातून स्वतःला मुश्किलीनं सोडवलं मी नव्या स्नेह बंधनात मनाला अगदी हलकेच गुंतवलं मी माझा तर प्रेमावरचा विश्वासच असता उडाला कोमल नव्या […]

तो

सहवास होता तुझा, सदोदित साथ देणारा…! संयम होता तुझा, माझे बोल झेलनारा…! जिद्द होती तुझी, नितांत प्रेम करण्याची…! तुझ माझ नातं कस्तुरीचं, एक थेंब सागरात मिसळलेलं….! एक थेंब सागरात मिसळलेलं….! – श्र्वेता संकपाळ

पंचपदी (लिमरिक)

आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’ इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’ इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली . – सुभाष स. नाईक

प्रेम अर्ध्या वाटेवरचं

मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं, अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं, थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं, तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं, प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं, कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! – श्वेता‌ संकपाळ

यशोगाथा

Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात, रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!! तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त, जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!! संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी, कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!! अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले, आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी […]

आशेची साऊली

ती दिसती दूर अंधुक छायेसी मूर्ती अतिरम्य पण मज ती दिव्य प्रतिमा गमती ते गंभीर”स्थित”वितरीतसे कृष्णकांती मनोहर दृश्य ते निम चांदण्या राती न नाव कुठले,गाव,नाही माहित कुठली जाती न दिसते त्या जाणिवांच भाव म्हणुनी राहती तिजपाहुनी असे वाटते आहेत गतजन्माची नाती मज भेटाया आलेली ती भूतकुळातील व्यक्ती असेल वा तो कोणी परलोकीचा देवदूत जो घेऊनि आला […]

सागर- किनारा

सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये , एकदा झाला मोठा वाद, सागराचे रौद्र रूप पाहूनी, किनाऱ्याने दिलीच नाही साद… फेसाळलेल्या लहरी मधुन, तो ओकत होता आग, सूर्य गेला समजवण्यास , पण तोही झाला बाद… खवळलेल्या लाटांनी मग, मस्तक आपटले किनाऱ्यावर, हळूच वरती पाहुनी, शिंपडले पाणी सूर्यावर… शेवटी चमचमत्या चांदण्यांचं, आकाश आले भेटीला, सुंदर शांत संध्या, होती त्यांच्या जोडीला… आक्रोश […]

आनंदी भाव हाच भगवंत

गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव काळ येता वृद्धत्वाचा    दाखवी मार्ग अनुभवाचा […]

एकटी मी

ना भावना, ना कल्लोळ मनी, ना अश्रु, ना हास्य नयनी, ना ध्यास, ना दिशा माहित, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! एक चंद्र , एक तारा, एक एकटा एकांत सारा, एक एकट्या जीवनात माझ्या, ज्योती असूनही काळोख सारा, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! नको सोबत, नको आधार कोणाचा, बस आहे आशिर्वाद माय – […]

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

1 … 270 271 272 273 274 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..