वनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )
गोपी : तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।। नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।। नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला मही नीलमेघ जलभरले, तैसा हा घनश्याम निळा ।। मोरपीस शोभतें शिरावर श्यामल तनुस खुलवी पीतांबर कटीं बासरी, करीं घोंगडी, तुलसीमाळ गळा ।। किति सांगूं […]
