जन्म

माझ्या अक्षर यात्रेतल्या प्रवासात स्पदनांचं धुकधुकणं थांबलंय अफाट वेगाची मर्यादा भोवाळतीय मनाला सतत धावणं ,सतत गुरफटणं वळणांचा ससेमिरा ही फार रे.. पायाखालचा रस्ता भुलवत नेतो त्या सांदी कपारीतून अव्यक्ताचं देणं असल्या सारखं शोध कुठवर घ्यायचा ..? मग माझ्या मनातले गहींवर ओंथंबून येतात.. एकेक शब्द लयींचा किनारा होतो.. निळ्याशार शाईचा समुद्र होतो.. बुद्धी भ्रष्टतेचे फासे दोन ,चार […]

फॅमिली

नुसतंच कोणाला तरी आवडणं आपलं आकर्षण वाटणं. ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. या ,अशा नात्यात समोरच्याला गृहीत धरलेलं अजिबात नसतं… जी असते ती व्यक्तीची स्वतःची ओळख असते….त्या साठी आयुष्यात येणारा त्याचा चाहता असावाच ही ही अपेक्षा नसते…  […]

ऋतुगंध

तुझं अवेळी कोसळणं भावतं मला भावनांचे उद्रेक झेलतानांही शांत असतोस माझा पाऊस नसतोच असा.. उन्मुक्त ,अव्यक्तच रहाणारा बेभान होणं जमत नाही तुला.. अनावरतेचा मखमली साज ही पेलत नाही तुला नागचाफ्यांतला गंध श्वासांत भरून रहातो.. शुभ्रमौतिकांचे सडे सांडत येणारी प्रत्येक ओळ मी गिरवत रहाते माझ्या तळहातावर.. प्रतिबिंबातला अनोळखी होत जाणारा शहारा सरसरत रहातो शरीरभर… अंगभर लपेटून घेते […]

दाक्षायणी

गौरी, अभाव्या अहंकारा, अग्निज्वाला.. अनेकशस्त्रहस्ता ईतकी सामर्थ्यशाली असूनही दक्षाच्या अपमानामुळे यज्ञकुंडात समिधे सारखी जळत..राहीली.. उमा-पार्वती ..तीचा उद्वेग कवितेतून मांडायचा प्रयत्न मी केलाय .. मागच्या वर्षी केलेली कविता थोडी वाढवली आहे .. चंद्रचूडासाठी पुन्हा गौरी, अपर्णा  […]

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!

ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’ […]

पयोधी

मनातल्या कोलाहलाला मार्गस्थ करतोय मी, नेणीवेच्या जाणिवांना ही … प्रकांड तांडवाचा अभिशाप भोगतोय.. उसळणाऱ्या माझ्यातल्या उर्मींना शमवतोय ही मीच… सोनेरी वर्खाचा देखणा गालीचा, अवकाशाचे मखमली पांघरुण आच्छादून, निद्रीस्त होणारा, सृष्टीच्यावरच्या प्रत्येक घटनांचा साक्षीदार ही मीच… क्षितिजाचा अनादी अनंत रक्षक मी … निर्झरणि , तरंगिणी चे समर्पण स्विकारणारा , व्योमात व्यापून राहीलेल्या शशांक,भास्कराची धूनी शांत करणारा ही […]

निर्णय

मर्यादेच्या कुंपणात राहूनच करायचंय सगळं संस्कार माझे हतबल होतीलच कसे..? अविश्वासाचं मोहोळ ही उठवू नकोस… माझ्या भोवती…. बहकतांना तुझ्या भूल थापांना त्यांनीच तर गर्तेच्या विळख्यातून सोडवलंय….मला प्रत्येक वेळी… बहरले जरी आता , रातराणीचा बेधुंद पणा लेवून… स्वैर वागण्याची शिक्षा ही देवू नकोस…. माझं स्ञीत्व जपणं सोपं नाही… पण अगतिकता ही एवढी नाही…. उन्मळून पडण्या पेक्षा… घट्ट […]

आर्जव

तुझ्या अश्रुंच्या चांदण्यांना आवर…. माझ्या ओंजळीतल्या उन्हात पाघळतील… तुझ्या अवखळ बटांना सावर… माझा हलकेच घात करतील… करू नकोस विषयांच्या शरांचा भडीमार… सावरता येणार नाही स्वतःला… मोहोर यौवनाचा सांभाळ भ्रमिष्ट व्हायचं नाहीये मला…. स्ञीत्वाचा अंगार जपून ठेव थोडासा… आहुती होण्याचं भान राहील मला…. मंञमुग्धतेची मशाल थोडीशीच पाजळ… भोवतालचा तुझ्याच नुसता आसमंत व्हायचं नाहीये मला… बेगडी सौंदर्या च्या […]

अंतराय

शांत नितळ सागरातलं वादळ तसा तुझा बासरीचा सूर.. घनगंभीर तरी मोहक, व्ययातील तारकामंडलाला व्यापणारा… कोटी स्वर भास्करांचा महामेरू सहज पेलणारा… कित्येक युगांची तृषा जागवणारा… माझ्या स्पदनांनी ही अंतराय निर्माण करणारा… मंञमुग्ध करणं ही जादूगिरी तुझी.. त्या अनवट स्वरांवर अलवार हींदोळे घेणं भाग्य जन्मांतरीच… कुठे शोधायचं तुला?कसं रोखायचं स्वतः ला..? पापण्यांचे कवडसे एकदा तरी खुले कर…. प्रत्येक […]

मृगया

जीव काढून घ्यायचा आणि विचारायचं जिवंत आहेस का…? किती सोयीस्कर बदलतोस भूमिका तुझी…? बेफाम वादळात… शिड म्हणून वापरायचं आणि म्हणायचं तुटते आहेस का…? किती ग्राह्य धरायचं तुला…? अग्नी पंखांची भरारी व्हायची मी आणि म्हणायचं माझ्यासाठी फडफडशील का…? सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं… आणि म्हणायचं भावनांचे रंग भरशील का…? वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं आणि म्हणायचं सोसशील का…? एकतानतेत […]

1 2