आर्जव

तुझ्या अश्रुंच्या चांदण्यांना आवर….
माझ्या ओंजळीतल्या उन्हात पाघळतील…
तुझ्या अवखळ बटांना सावर…
माझा हलकेच घात करतील…
करू नकोस विषयांच्या शरांचा भडीमार…
सावरता येणार नाही स्वतःला…
मोहोर यौवनाचा सांभाळ
भ्रमिष्ट व्हायचं नाहीये मला….
स्ञीत्वाचा अंगार जपून ठेव थोडासा…
आहुती होण्याचं भान राहील मला….
मंञमुग्धतेची मशाल थोडीशीच पाजळ…
भोवतालचा तुझ्याच नुसता
आसमंत व्हायचं नाहीये मला…
बेगडी सौंदर्या च्या
सीमा पार कर जरा….
आश्वस्त, आधाराचा हात देईन तुला…

© लीना राजीव.

— सौ. लीना राजीव देशपांडे

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…