नवीन लेखन...

देह समजा सोय

जेव्हां मी म्हणतो माझे,  सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात….१,   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे…..२   भजन करा प्रभूचे, सूख देवूनी देहाला परि केवळ सुखासाठीं,  विसरूं नका हो त्याला……३,   देह चांगला म्हणजे, ऐश आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, त्यांने प्रभू मिळवावे…..४ […]

चक्र

मरूनी पडला एक प्राणी,  जंगलामधल्या नदी किनारी  । कोल्ही कुत्री आणि गिधाडे,  ताव मारती त्या देहावरी  ।।१।। एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरी  । आज गमवूनी प्राण आपला,   तोच दुजाची बने भाकरी  ।।२।। निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे  ।। एक मारूनी जगवी दुजाला,  हीच त्याची विशेष अंगे  ।।३।।   डॉ. […]

तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी […]

अमृतानुभव

चैतन्य तुझ्या हृदयीचे सदैव असेच राहू दे खोडकरपणा तव मनीचा सदैव असाच राहू दे । वार्धक्याची जाणीव नच व्हावी तुजला कधीही मजवरचा प्रेमवर्षाव सखे सदैव असाच राहू दे । आता भांडण नच कोणाशी ना वैर आहे आपुले एकमेकावरील प्रेमाची साथ सदैव टिकून राहू दे । तुजवरील प्रेमाने मी रचिल्यात कैक कविता जरी त्या कवितेतील रचनांचा कैफ […]

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।।१।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।।२।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।।३।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही […]

धरणीकंप

कांपू नकोस धरणीमाते  ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।३।।   गीतेमध्ये दिले वचन    अर्जुनासी प्रभूचे  तोंडून प्रभूचे होईल पुनरागमन अत्याचार वाढता जगाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे   । विविधता पाही ,  रंग आयुष्याचे   ।।१।। सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी   ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार   ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   ।।४।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.com […]

प्रितीची नवी ओळख 

रिमझिम पाऊस आला सृष्टी रोमांचित झाली प्रेमाच्या वर्षावात दोघं होती नहाली थोडावेळ एकाच छत्रीत दोघं होती चालली स्पर्शाला टाळत नंतर आडोशाला स्थिरावली मी हलकेच नजर तिच्याकडे वळवली ओल्या गालावरून लाज होती घसरली सोसाट्याचा वारा तरी ती नाही घाबरली नकळत थोडीशी माझ्या बाजूला सरकली थंड वाऱ्याच्या स्पर्शाने जरी ती शहारली संयमाला टेकून हलकेच कुडकुडली मध्येच विज कडाडली […]

ओढ प्रितीची

गालावरील लाली तुझ्या आजही टिकून आहे धुंदी गुलाबी ओठांची अजूनही तशीच आहे । पाहून मजकडे स्मीतहास्य तू आता नको करु गालावरची गोड खळी ती घायाळ करीत आहे । माळू नकोस तू तव केसात गजरा तो सुगंधी नहालेल्या केसांचा सुगंध धुंद मज करीत आहे । खट्याळ तव नजरेने मजकडे तू पाहू नको भाव तव डोळ्यातील बेहोश मज […]

1 … 264 265 266 267 268 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..