विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  ।

जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।।१।।

जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  ।

नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।।२।।

मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  ।

मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।।३।।

पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही संकटे  ।

मानव निर्मित युद्ध दंगली,  सूड भावना तेथे पेटे  ।।४।।

विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे  ।

बिघडले घर देईल बांधूनी,  विश्वास बाळगी ईश्वराकडे  ।।५।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 About डॉ. भगवान नागापूरकर 1168 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

Loading…