नवीन लेखन...

मराठीसृष्टीचे लेखक डॉ. भगवान नागापूरकर यांच्या कवितांचा हा संग्रह.

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता  १ धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज  २ मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी ३ त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी […]

 देह एक बदलणारे घर

बदलीत गेलो घरे मी माझी,  आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।। बालपण हे असेंच गेले,  फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती,  धंदा करणे माहीत नाही  ।। पाऊलवाट तीच निवडली,  मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही,  एका मागून एकापाठी  ।। गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके […]

सर्वात तोच आहे

अगणित तारे जीव जीवाणूं  । अथांग विश्व अणू रेणू  ।।   रंगरूप हे नेत्री दिसती  । भिन्न भिन्न राहूनी जगती  ।।   रस गंध दरवळे चोहीकडे  । जगण्याचा तो मार्ग सापडे  ।।   हे जर आहे रूप ईश्वरी  । बघती त्याला आमुच्या नजरी  ।।   सुख दु:ख ही त्याची निर्मिती  । फिरे सदा आमचे भोवती  ।। […]

खेचून मिळवा

तो तर देत नसतो कांहीं, घ्यावे लागते खेचूनी  । शक्ती लावूनी खेचा सारे, देईल परि ढील सोडूनी  ।। जरी असला दयेचा सागर, केवळ मागणें मान्य नसे  । तुटून तुमचे प्रयत्न होता, ओजळीने तो देत दिसे  ।। व्यर्थ घालवी जीवन कांही, स्वार्थीपणाच्या मागणी पायी  । वेडे ठराल तुम्हींच परि, काळ मात्र कधी थांबत नाही  ।। धडपड करा, […]

 निती मूल्ये विसरला

विसरलास तू मानव पुत्रा, नीतिमूल्ये सगळी, काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली….।। धृ ।।   स्वप्नामध्ये दिले वचन, पाळीले ते राज्य घालवून, हरिश्चद्रांची कथा आजही करीते मान ताठ आपुली….१, विसरला तू मानव पुत्रा  नीतिमूल्ये सगळी,   राजा साठी देई प्राण, दुजासाठी होते जीवन, ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी शिवरायाची शान राखली….२, विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये […]

रामाची व्याकूळता

सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।।   पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी   रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी   वाणी ज्याच्या शक्ती शिवाची […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे,  पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती,  काव्य रचना करूनी जाती  ।। अवचितपणे विचार येतो,  भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी,  पद्यरूप जातो देऊनी  ।। सतत वाटते शंका मनी,  हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती,  माझे कडूनी करवून घेती  ।। तळमळ आता एक लागली,  जाणून […]

प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।। पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला,   ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  । त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  ।। उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  । वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  ।। कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  । वाटत होते […]

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..