नवीन लेखन...

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे,  पद्यामधल्या काव्य रसाचे  ।

कोठून येते सारी शक्ती,  काव्य रचना करूनी जाती  ।।

अवचितपणे विचार येतो,  भावनेशी सांगड घालीतो  ।

शब्दांचे बंधन पडूनी,  पद्यरूप जातो देऊनी  ।।

सतत वाटते शंका मनी,  हे न माझे, परि येई कोठूनी  ।

असेल कुणी महान विभूती,  माझे कडूनी करवून घेती  ।।

तळमळ आता एक लागली,  जाणून घ्यावी  शक्ती आगळी  ।

अर्पीन माझे प्राण त्याला,   स्फूर्ती देवता जो मज झाला  ।।

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1954 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..