‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  ।

सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।।

वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  ।

प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।।

साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  ।

विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।।

झाडावरले पडता फळ,  भूमी घेई खेचूनी त्याला  ।

गुरुत्वाकर्षण शक्ति ही,   झलक दाखविते जगाला  ।।

ईश्वर अस्तित्व भासे,  अशाच शक्तीरुपानें  ।

अद्दष्य असुनी परिणाम,   दाखवी सुप्त गुणानें  ।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1331 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on ‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

  1. फारच छान.
    विश्वातील ४ मूलभूत भौतिक बलंच विश्वाचा कारभार चालवितात. ही बलं कशी निर्माण झाली याची कल्पना करणं मानवी मेंदूच्या मर्यादेपलीकडचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…