गुरुला नसते जात
गुरुला नसते ज़ात गुरुला नसतो धर्म गुरु, फक्त जाणतो ज्ञानदानाचें मर्म ।। – – – सुभाष स. नाईक.
गुरुला नसते ज़ात गुरुला नसतो धर्म गुरु, फक्त जाणतो ज्ञानदानाचें मर्म ।। – – – सुभाष स. नाईक.
दोघे मिळून आलां हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची […]
जेव्हां मजला कळत होते, निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची, शरीर होते निकामीं ।।१।। निद्रेमधल्या स्थितीत जाता, जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं, एकत्र न येते ।।२।। निद्रावस्था नि जागेपणा, याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी, मध्य बिंदू साधते ।।३।। देह मनाला विश्रांती देई, ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी, […]
नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।। प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी राहूं […]
खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते नक्षीदार तो पिंजरा घेवूनी, शोभिवान मी केले घरातें…१, प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं पक्षानें त्या मान टाकली, पडला होता तळात मरूनी…२, क्षणभर मनी ती खंत वाटली, राग आला तो स्वकृत्याचा अकारण ती हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा…३, किती बरे ते निच मन हे? निराशा […]
भाग्य असे अती थोर अमुचे असे गुरुजन आम्हा लाभले जन्म जन्मीचे सार्थक की हो या एकाच जन्मी जाहले । दिले विविध ग्रंथातील ज्ञान भाषा इतिहास भुगोल शिकविला विविध कला शास्त्रे शिकविता गणीत जिवनाचे समजाविले । पारंपारीक शिक्षण देऊनी शिक्षीत आम्हाला बनविले आदर्श स्वतःच्या आचरणाने सुसंस्कृत आम्हांला घडविले । करीतो नमन त्या थोर गुरुजना ज्यांनी स्वातंत्र्यवीर बहू […]
‘आम्ही क्षमस्व आहो’ , मोबाइल बडबडताहे ‘तुम्ही क्षमस्व आहां , मग मीही क्षमस्व आहे’. ‘क्षमस्व’ म्हणजे काय , कुणां हें नक्की ठाउक नाहीं करतां वापर हास्यास्पद , तिरकस प्रतिसादा मीही ! ‘चूकच नाहीं’, अन् ‘सोऽ व्हॉऽट्’हि, भलता चढला पारा क्षमस्व ; खून करुन भाषेचा, खुशाल माथीं मारा. – क्षमस्व : (संस्कृत) : क्षमा कर ( अशी […]
दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर अती उत्साहाने फूंकर घातली …आणि फटाक्यांची माळ माझ्या हातातच फूटली जखम पाहुन सारी हळहळली वेदना मला ती असह्य झाली छोटी अनु जरी घाबरली धीर दिला मला,नाही ती रडली अगदी शांतपणे येऊन माझ्या उशाशी ती बसली मांडीवर डोकं घेऊन मायेने हात फिरवु लागली मी बळेबळे हसलो पण ती नाही फसली माझी वेदना तिच्या डोळ्यात […]
शांत नितळ सागरातलं वादळ तसा तुझा बासरीचा सूर.. घनगंभीर तरी मोहक, व्ययातील तारकामंडलाला व्यापणारा… कोटी स्वर भास्करांचा महामेरू सहज पेलणारा… कित्येक युगांची तृषा जागवणारा… माझ्या स्पदनांनी ही अंतराय निर्माण करणारा… मंञमुग्ध करणं ही जादूगिरी तुझी.. त्या अनवट स्वरांवर अलवार हींदोळे घेणं भाग्य जन्मांतरीच… कुठे शोधायचं तुला?कसं रोखायचं स्वतः ला..? पापण्यांचे कवडसे एकदा तरी खुले कर…. प्रत्येक […]
स्वप्न पहावीत… नाही कोण म्हणतंय ? स्वप्नं जरूर पहावीत. इतकी सारी पहावीत की त्यांची ढिगारे व्हावीत. भान ठेवून उघड्या डोळ्यांनी त्या स्वप्नांकडे पहावं. निर्धाराच्या अचूक बाणाने त्या स्वप्नांना वेधावं. स्वप्नांसाठी आजच्या वर्तमानाला निरर्थक नाही मारावं. उद्यासाठी आजच्या क्षणाला व्यर्थ नाही टाळावं. अशक्य अश्या स्वप्नांसाठी शरीराने जरूर थकावं. पण न खचता मनानं पून्हा धैर्यानं उठावं. तुटलेल्या मोडलेल्या […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions