प्रतिक्षा

भिंत ओलेती मनाची तुझ्या आठवणी झिरपलेल्या, धुळीत थेंब टपोरे , देती आठव ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या, तुझ्या हास्याची जाळी काढी नक्षी त्या छताला, प्रतिबिंब तुझे झळकते जेव्हा पाहतो स्वतःला, किती भकास उदास तुझ्याविना घर मनाचे गं जन्म देण्यास आतूर जडावलेले गर्भ घनाचे गं, झाली जीर्ण वास्तू मनाची तुझे येणे होत नाही, अवकळा येते त्या घरास जिथे […]