प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी

झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।

शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,

लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी  ।।

तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी,

माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।।

आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत,

तुझी शक्ति मला छळे, तें तुला कांहीं न कळे,  ।।

थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,

तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो  ।।

टाकलेल्या विटेवरी, उभा राहिलो मी दूरी,

परि तू गेला निघूनी,  मजला उभा करूनी  ।।

होऊनी गेली अठ्ठावीस युगे,

आज देखील मी वाट बघे  ।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1385 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…