मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही ,  रंग आयुष्याचे  ।।१ सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी  ।।२ लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार  ।।३ जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय  ।।४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

 भावनेच्या आहारीं 

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं […]

मानवता धर्म

परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता न प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती धर्म […]

आनंदी भाव हाच भगवंत

गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं  ।।१ बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता  ।।२ तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा  ।।३ संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव  ।।४ काळ येता […]

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द, लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।। अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य, एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।। होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी, नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।। जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो, प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो […]

आत्मविश्वास

जे जे मजला हवेच होते,  मिळवित गेलो यत्न करूनी चालत असता जेव्हा पडलो,  उठलो होतो धीर धरूनी आतंरिक ती शक्ती माझी,  पून्हा पून्हा तो मार्ग दाखवी शरिराला ती जोम देवूनी,  वाटेवरती चालत ठेवी, निराश मन हे कंपीत राही,  विश्वालासा तडे देवूनी दु:ख भावना उचंबळता,  देह जाई तेथे हादरूनी परि विवेक हा जागृत होता,  विश्लेषन जो करित […]

सत्य जीवन

हिशोब तुजला घ्यावयाचा,  मानव दरबारी थोडा दृष्य केले जे का येथे,  मानव वाचील त्याचा पाढा…..१ अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण,  ना  कोणी येथे खरा हिशोब तोच कर्माचा,  पाप असो वा पुण्य मग ते….२ नीती अनीतीच्या चाकोरीतून,  जाई कुणीतरी असा एकटा मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा….३ बाह्यांगाचे कर्म निराळे,  शरिरमनाशी निगडीत ते अंतकर्मे आत्म्याची […]

खरे श्रेष्ठत्व

कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला   ।    मानव हा आत्मस्तुती करतो   ।। कुणा न येती भाषा बोली    ।    हीच गोम हा जाणून घेतो  ।।   निसर्गाने उधळण केली  ।  अनेक गुणांची   ।। मानवाच्या हाती लागली   ।   ‘कला’ कल्पकतेची   ।।   विचारांच्या झेपामधूनी  ।    आकाश पातळ गाठले   ।। प्रगतीच्या ह्या छलांगानी  ।    श्रेष्ठत्व  ठरवियले   ।।   दुर्बल केले इतर […]

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असताना कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी सांज समयी बंद झापडे,  ठेवीत त्यांना बाह्य एकटे नित्य दिनीच्या प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी चिमण्या बांधीत घरटे पूनरपी,  दिवसभरीचे […]

1 2 3 21