निवृत्तीची वृति

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी दूर ही जावूनी खंत न वाटे,  घडत असते कसे मनी…१, बहुत वेळ तो घालविला,  फुल बाग ती करण्यामध्ये विविध फूलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे….२, कौतुकाने बांधी घरकूल,  तेच समजूनी ध्येय सारे कष्ट करूनी मिळवी धन,  खर्चिले ते ह्याच उभारे…३ संसार करूनी वंश वाढवी, संगोपन ते करूनी […]

दर्पण

चित्र उमटते दर्पनात ते,  सुंदर असेल जसे तसे धूळ सांचता दर्पना वरी,  चित्र स्पष्ट ते दिसेल कसे   दर्पना परि निर्मळ मन,  बागडते सदैव आनंदी दुषितपणा येई त्याला,  भावविचारांनी कधी कधी   निर्मळ ठेवा मन आपले,  झटकून द्या लोभ अहंकार मनाच्या  त्या पवित्रपणाने,  जीवन होत असे साकार   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

तेज

किरणात चमक ती असूनी,  तेजोमय भासे वस्तूंचे अंग सूक्ष्म अवलोकन करीता,  कळे तेज ते, वस्तूचाच भाग…..१,   जसे तेज असे सूर्याचे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील,  सर्व जनांना हेच सांगते…२,   तेजामुळेंच वस्तू दिसती,  विना तेज ती राहील कशी तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

सद्‌गुरु

भटकत जातो वाटसरू तो,  जंगलामधील अज्ञात स्थळी आंस लागते जाण्याकरिता,  दूरवरच्या दिव्या जवळी…१, मार्ग जाण्याचे ज्ञात नसूनी,  निराशेने वेळ दवडितो ध्येय दिसत असून देखील,  मार्गामुळे अडून पडतो…२, अज्ञानाच्या अंधारात आम्हीं, शोधत असतो असेच त्याला मार्ददर्शन ते सद्‌गुरुचे,  न लाभता ध्येय मिळे कुणाला…३, वाट दाखवी सद्‌गुरु आम्हां,  प्रभूचरणी त्या जाण्याचा दुवा साधतो आमच्यामध्ये,  त्यात एकरूप होण्याचा…४ — […]

विधी कर्माना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी,  भस्म लावीले सर्वांगाला वेषभूषा ती साधू जनाची,  शोभूनी दिसली शरिराला खर्ची घातला बहूत वेळ,  रूप सजविण्या साधूचे एक चित्त तो झाला होता,  देहा भोंवती लक्ष तयाचे शरिरांनी जरी निर्मळ होता,  चंचल वाटले मन त्याचे प्रभू मार्गास महत्त्व देतां,  विसरे तोच चरण प्रभूचे विधी कर्मात वेळ दवडता,  प्रभू सेवेसी राहील काय ? देहाच्या हालचाली […]

निरोगी देही नामस्मरण

शरीर निरोगी असतां तुमचे,  नामस्मरण ते करा हो प्रभूचे ठेवू नका कार्य  उद्या करिता,  हाती काय येई वेळ गमविता शरिराच्या जेव्हा नसतात व्याधी,  राहू शकतात तुम्हीच आनंदी आनंदातच सारे होवू शकते,  प्रभू चरणी चित्त लागून जाते व्याधीने जरजर होता शरिर,  कसे होईल मग ते चित्त स्थिर स्थिरांत दडला असूनी प्रभू तो,  स्थिर होवूनीच बघता येतो नाशवंत […]

कल्पकतेमुळे निराशा

निराशेचे बीज पेरतो,आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी,जगा पाही त्याच दिशेने ।।१।। जाणूनी ईश्वरी स्वरूप,प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत,तशीच प्रतीमा दिसावी ।।२।। तपसाधना ती बघूनी,कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने,न होई त्याचे अवलोकन ।।३।। सभोवतालच्या वस्तूंमध्यें,जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात,भावना तशी उमटते ।।४।। अस्तित्वाची जाणीव देतो,हर एक घडीचा ठेवा, ध्यास लागतो आम्ही,परी कल्पिलेल्या […]

बंदीस्त करा मनाला

वातावरणी वस्तू पडतां,  नाश पावते लवकर ती हवा पाण्याच्या परिणामानें,  हलके हलके दूषित होती ठेवूं नका उघडयावरती,  वस्तू टिकते निश्चीतपणे दूषितपणाला बांध घालता,  कसे येई मग त्यात उणे बाह्य जगातील साऱ्या शक्ति,  आघात करती मनावरी दुषिततेचे थर सांचूनी,  मनास सारे दुबळे करी देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य […]

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं,   रंगात आला खेळ मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ…..१,   खेळाच्या कांहीं क्षणी,  टाळ्या शिट्या वाजती आनंदाच्या जल्लोषांत,  काही जण नाचती…२,   निराशा डोकावते,  क्वचित त्या प्रसंगीं, हार जीत असते,  खेळा मधल्या अंगी….३,   सुज्ञ सारे प्रेक्षक,  टिपती प्रत्येक क्षण खेळाडू असूनी ते,  होते खेळाचे ज्ञान….४,   मैदानी उतरती,  ज्यांना असे सराव जीत त्यांचीच […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे गमावून टाकी,  जाणूनी फुकाचे….१, लागत नसते,   दाम वेळेसाठीं म्हणून दवडे अकारणा पोटीं….२, वस्तूचे मूल्य ते,  पैशांनीच ठरते समज सर्वांची,  अशीच असते…३, वेडे अहा सारे,   कसे होई मूल्य वेळ जातां मग,  आयुष्य जाईल…४, वेळ दवडतां,   कांहीं न राहते सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते….५   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

1 2 3 4 19