नवीन लेखन...

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन    खोदून आणली माती कौशल्य पणास लावून   केला मी गणपती   ।।१।।   मुर्ती बनली सुरेख    आनंद देई मनां दाम मिळेल ठिक   हीच आली भावना   घेऊन गेलो बाजारीं   उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी   निराश झालो मनांत   बहूत दिवस प्रयत्न केला    कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला    गणपती मी शाळेत   […]

तपसाधनेतील परिक्षा

पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप […]

स्मरण असू दे

हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

 जीवनाचा खरा आनंद

केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा   ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा   ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी   पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले   पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली   वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी   मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान […]

सर्वस्व अर्पा प्रभुला

केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन     हीच भावना उरीं   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०     […]

नाहीं विसरलो देवा

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।   […]

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  //   भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   […]

1 2 3 4 5 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..