नवीन लेखन...

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार  निसर्गा तूझे मी

उघडोनी जीवन द्वार  आलास तूं कामी  १

 

तुझ्या मोरानें   दाखविले नृत्य

राघूच्या वाणीनें   शिकविले सत्य  २

 

कोकीळेचे गान   सप्तसुरांच्या लहरी

चित्रकलेचे ज्ञान   इंद्रधनुष्या परि  ३

 

मुंग्याची वारुळे   दाखवी वास्तूकला

कोळ्याची जाळे   शिकवी हस्तकला  ४

 

घारीची भरारी   स्वछंद केले मनां

मैनेच्या उदरीं    जाणला प्रेमळपणा  ५

 

विजेची चपळता   चंचल बनवी

धबधब्याची प्रचंडता   श्रेष्ठत्व जाणवी  ६

 

निसर्गातील विवीधता   देई माणसा ज्ञान

करी त्यास मदत   आनंदी होण्या जीवन  ७

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2025 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..