Web
Analytics
मिष्किल तारे – Marathisrushti Articles

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे

लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१

कधी जाती चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी

खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२

एक एक जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं

संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३

हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा बिचारा

स्थिर राहूनी लपतां लपतां,  खेळांचा वाढवी पसारा….४

निशाराणीची मुले ही सारी,  खेळत राहती रात्री बिचारी

उषाराणीशी बघतां ,  निघूनी जाती आपल्या घरी….५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1194 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…