Web
Analytics
आयुष्य लढा – Marathisrushti Articles

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे,  आपल्या जीवन कर्माचा

कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१

घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ

क्षणात टिपून उचलून घेतो,  साधूनी घेता अवचित वेळ..२

सदैव तुमच्या देहाभवती,  त्या देहाचे कर्मही फिरते

आत्मा जाता शरीरही जाई,  कर्मवलय परि येथेच घुमते….३

पडसाद उमटती त्या कर्माचे,  सभोवतालच्या वातावरणी

वेचूनी त्यातील भलेबुरे ,  मागे राहतील विविध आठवणी….४

हाच हिशोब जीवनाचा,  दुजा वाचतो इथेच पाढा

इतरांसाठी जगता जेव्हां,  सार्थकी होतो आयुष्य लढा…५

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1333 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…