नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

चंद्राच्या मातीतून उगवलं रोपटं! भविष्यात चंद्रावर शेती शक्य?

काही वर्षांपूर्वी ज्या चंद्राकडे लहान मुले आपला मामा म्हणून पाहत होती , त्याच चंद्रावर नंतर मानवाची पावले उमटली . नंतरची पिढी चंद्रावर वसाहत तयार करण्याचा विचार करू लागली . चंद्रावर पाणी आणि अन्य जीवनोपयोगी गोष्टींचा शोध घेऊ लागली . आता नवी पिढी चंद्रावर चक्क शेती करू पाहत आहे . होय ! विश्वास बसणार नाही ; पण हे खरे आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – 6 : मूलमती

रामप्रसाद ह्यांचे पहिले पिस्तुल घ्यायला पैसा मूलमतींना पुरवला. ते हाती देतांना मात्र एक वचन घ्यायचे त्या विसरल्या नाहीत, की अगदी कुठल्याही प्रसंगी, आपल्या शत्रूवर सुद्धा ह्या शस्त्राचा गैरवापर करणार नाही. […]

मुंबई-डेहराडून एक्सप्रेस

भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात. मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व […]

अंड्यांवरचं गणित

पक्ष्यांच्या जातींनुसार त्यांच्या अंड्यांच्या आकारात विविधता असते. काही अंडी गोलाकार असतात, तर काही अंडी लांबट असतात… काही अंडी दोन्ही बाजूंना सारख्याच प्रमाणात निमुळती असतात, तर काही अंडी एका बाजूला जास्त निमुळती असतात. अंड्यांचा आकार पक्ष्याच्या जातीनुसार वेगवेगळा असला तरी, तो काही गोष्टींच्या दृष्टीनं योग्य असायला हवा. उदाहरणार्थ, अंड हे उबवण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर आकाराचं म्हणजे त्या पक्ष्याच्या […]

भारतमातेच्या वीरांगना – 5 : झलकारी बाई

आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता. […]

रेडिओचे जादुई दिवस

आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं. […]

मुंबई ते दिब्रुगड (आसाम): प्रवास राजधानी एक्सप्रेसचा

भारताचं अतिपूर्वेचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्याच्या सीमेपर्यंत रेल्वेनं जायचं म्हणजे ६० ते ६५ तासांच्या प्रवासाची मानसिक तयारी असावी लागते. हे अतिपूर्वेकडील सर्वांत मोठं राज्य. त्यातच हा चिनी सरहद्दीवरील संवेदनशील प्रदेश. दुर्दैवानं, या ठिकाणी अजूनही रेल्वेचा मागमूसही नाही, घनदाट जंगलांनी संपन्न असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील लाकडापासून रेल्वेच्या रुळांमधील स्लीपर्स बनविले जातात. किंबहुना, संपूर्ण भारताच्या रेल्वेलाईनची मदार एक […]

भारतमातेच्या वीरांगना – 4 : अरुणा आसफ अली

१९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला. […]

फ्रंटियर मेल (गोल्डन टेंपल मेल)

मुंबईहून दिल्लीमार्गे थेट पाकिस्तानच्या सरहद्दीपर्यंत जाणारी पश्चिम रेल्वेवरील ही एक अति-महत्त्वाची गाडी. दोन रात्रींचा प्रवास करत ही गाडी मुंबईहून अमृतसर शहर गाठते. सरहद्दीपर्यंत जाणारी गाडी म्हणून पूर्वी तिचं नाव ‘फ्रंटियर मेल’ असं होतं. पुढे अमृतसर तेथील सुवर्णमंदिरामुळे प्रसिद्धीस आल्यानंतर या गाडीला ‘सुवर्णमंदिर एक्सप्रेस’ असं नाव ठेवलं गेलं. आज ही गाडी त्या दोन्ही नावांनी ओळखली जाते. ब्रिटिश […]

भारतमातेच्या वीरांगना – 3 : यशोदा गणेश सावरकर

आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. […]

1 58 59 60 61 62 221
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..