नवीन लेखन...

डिजिटल थर्मोमीटर

घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो. अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटरचा इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली  याने पहिला थर्मोमीटर  तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव  होते. तो फार अचूक नव्हता.

अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला. जर्मन वैज्ञानिक फॅरनहीटने तो तयार केला.  त्याने त्यावेळी गोठण मिश्रणाचे तापमान शून्य अंश फॅरनहिट, पाण्याचा गोठणबिंदू ३२ अंश फॅरनहीट, तर मानवी शरीराचे तापमान ९६ अंश फॅरनहीट असे तीन टप्पे सांगितले होते. नंतर असे दिसून आले की, माणसाच्या शरीराचे नेहमीचे तापमान ९८.६ अंश फॅरनहीट (३७ अंश सेल्सियस) असते. १७४२ मध्ये अँडर्स सेल्सियसने त्यात आणखी सुधारणा केल्या.

१९५४ मध्ये अमेरिकेतील कर्नल जॉर्ज पेरकिन्स यांनी पहिला इलेक्ट्रॉनिक क्लिनिकल थर्मोमीटर तयार केला, त्यात स्टेनलेसचा प्रोब, मर्क्युरी सेल बॅटरी व छोटासा मीटर असे भाग होते. नेहमीच्या थर्मोमीटरमध्ये काचेची नळी असते व त्याला टोकाला एक बल्ब सारखा भाग असतो त्यात पारा असतो. त्याला उष्णता मिळताच पारा काचेच्या नळीत कॅपिलरीमध्ये वर सरकत जातो. पारा हा विषारी असल्याने अशा प्रकारच्या तापमापकांचा धोका जास्त होता, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स किंवा रंगीत अल्कोहोलसारख्या द्रवपदार्थ वापरुन इलेक्ट्रॉनिक डिजीटल थर्मोमीटर तयार करण्याची कल्पना निघाली. इलेक्ट्रॉनिक थर्मोमीटरना डिजिटल म्हणण्याचे कारण म्हणजे त्यात तापमानाचा थेट आकडाच दिसतो, त्यामुळे पाऱ्याची रेषा नेमकी कुठपर्यंत वर चढली आहे हे डोळे ताणून बघण्याचा त्रास वाचतो.

डिजिटल थर्मोमीटर तंत्रज्ञान हे थर्मोकपल, आरटीडी म्हणजे थर्मीस्टर यांच्यावर आधारित असते. थर्मोकपल हे अतिशय अचूक तापमान संवेदक असतात. तापमानातील थोडा बदलही ते टिपतात. थर्मीस्टर हा एक रोधक (रेझिस्टर) असतो, तापमानातील बदलानुसार त्याचा रोध बदलतो व नंतर त्यातील सर्किट या रोधाचे रुपांतर तापमानाच्या रुपात करते, त्यामुळे आपल्याला तापमानाचा आकडा दिसतो. डिजिटल थर्मोमीटरला बॅटरी असते.

परदेशात खोलीतील तापमान मोजण्यासाठी असे डिजिटल थर्मोमीटर वापरले जातात. त्यात प्रोग्रॅमिंग केले जाते. जेणेकरुन तुम्ही बाहेर गेलात की, ते बंद होतात व घरात आला की चालू होतात. यात थेट तापमानाचा आकडा कळत असल्याने फार सोयीचे असते.

— राजेंद्र येवलेकर.
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..