पुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले. परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला. आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली. […]
विश्व कीटक भक्षी वनस्पतींचे हे शीर्षक वाचून बऱ्याच वाचकांचे डोळे विस्फारतील. त्यांचा विश्वासही बसणार नाही. परंतु वनस्पती जगतात अशाही वनस्पती आहेत. त्यांची ओळख आपण ह्या लेखात करून घेणार आहोत. महाराष्ट्रातही अशा वनस्पती सापडतात. […]
मुघलांच्या काळात 9 रुपयांची 5 मोहोर व 5 मोहरांचे एक नाणेसुद्धा होते. अकबराच्या काळात नाण्यांमध्ये भरपूर वैविध्य होते. त्यावर राजाचे नाव टांकसाळीचे नाव, हिजरीसन, चार खलिफांची नावे, कलिमा, ईश्वराकडे मागितलेले आशीर्वाद आणि काही नाण्यांवर हिंदू देवदेवता इतके वैविध्य होते. नंतर जहांगीरने 12 राशींची 12 नाणी काढली. 1000 मोहरांपासून 12 किलो वजनाचे सर्वात मोठे नाणे काढले. […]
गॅलिलिओनं सोळाव्या शतकाच्या अखेरीस, पिसा इथल्या झुकलेल्या मनोऱ्यावरून केलेला एक कथित प्रयोग सर्वपरिचित आहे. या प्रयोगात गॅलिलिओनं वेगवेगळ्या वजनाचे दोन गोळे पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यावरून खाली टाकले व हे गोळे जमिनीवर पोचायला लागणारा वेळ मोजला […]
सपाट प्रदेश असो वा डोंगराळ प्रदेश असो, जंगलातला प्रदेश असो वा वैराण प्रदेश असो, उष्ण प्रदेश असो वा थंड प्रदेश असो… कोणत्याही प्रदेशातून निमूटपणे भार वाहून नेण्याचं काम करणारा प्राणी म्हणजे गाढव. घोड्याचा भाऊबंद असणारा हा प्राणी गेली हजारो वर्षं, त्याच्या पाठीवर टाकलेला भार इमानेइतबारे वाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी आढळणारा हा ‘गरीब बिचारा’ प्राणी उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांकडून दुर्लक्षित राहिला आहे. […]
पृथ्वीवर सापडणाऱ्या विविध खनिजांचा परामर्श घेतल्यानंतर ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रारूपाचा उलट्या प्रकारेही उपयोग केला. या संशोधकांनी आपल्या प्रारूपाद्वारे, अतिउच्च तापमानाला वितळणाऱ्या सुमारे वीस संयुगांची सूत्रं शोधून काढली आहेत. या संयुगांचे वितळणबिंदू सव्वातीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहेत. […]
एस. वेंकटरामन हे नव्वद वर्षांचे गृहस्थ खरे रेल्वेप्रेमी. १९२५ साली वयाच्या आठव्या वर्षी मद्रात ते विजयवाडा असा पहिला रेल्वेप्रवास त्यांनी केला. तेव्हापासून त्यांचं आयुष्य रेल्वेशी जोडलं गेलं आहे. रेल्वेत मटिरियल मॅनेजर म्हणून हुबळी, वाराणसी, अशा विविध गावांत त्यांनी काम केलं. रेल्वेमधून निवृत्त झाल्यावर ‘Indian Railways at a glance’ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. गेली ३० […]
फायब्रोस्कोप म्हणजेच एन्डोस्कोप नावाच्या यंत्राने आपल्याला मानवी अवयवांची अत्यंत अचूक अशी तपासणी करता येते. सर्पिलाकार दिसणाऱ्या या अवयवाने केल्या जाणाऱ्या तपासणीला एन्डोस्कोपी म्हणतात. ही एक प्रकारची दुर्बीण असते व ती मानवी शरीरात घालून कुठे काय झाले आहे हे पाहता येते. […]
तुलसी आणि तिला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व याबद्दल अनेक कथा पुराणांतरी सापडतात. तुळस विष्णूपत्नीस्वरूपच असल्याने तिला विष्णूपूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीला उद्देशून हे प्रार्थनास्तोत्र संत पुण्डरीक यांनी रचले आहे. तामीळनाडूमधील तिरुकडलमलै या गावी त्यांचे वास्तव्य होते. श्रीविष्णूंच्या नित्यपूजेत ते कमल फुलांचे उपयोजन करीत असत. एके दिवशी त्यांना भगवंताने गरीब भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले. त्याचेसाठी पुण्डरीक अन्न घेऊन येईपर्यंत त्या ब्राह्मणाचे विष्णुमूर्तीत व कमळांचे तुलसीपत्रांत रूपांतर झाले होते. या प्रसंगानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली. […]
मानवी शरीरातील नेहमी तपासता न येणाऱ्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कानांना ऐकू न येणाऱ्या म्हणजे अल्ट्रासाउंड ध्वनी लहरींचा वापर केला जातो. क्ष-किरणांप्रमाणेच या ध्वनिलहरी हव्या त्या भागावर केंद्रित करता येतात. अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातील ध्वनी लहरींचा उपयोग करून शरीराची तपासणी करण्याच्या तंत्राला सोनोग्राफी असे म्हणतात. […]