नवीन लेखन...

अधीर मन काय पावते (सुमंत उवाच – ८४ )

अधीर मन काय पावते, बधिर मनास काय सांगते

धीर तो कसा घडवावा, कसा तोल मनी राखावा

व्यक्त होणे न सदा चांगले, न अबोल राहणे सदा योग्य

प्रेम, भक्ती शब्दांत व्यक्त व्हावी, राग लोभ मुकाट बांधूनी ठेवावी!!

अर्थ

हा माझा मित्र आहे ना, अगदी चिकित्सक आहे. कुठे काय बोलावं कळत नाही याला. चिकित्सक असावं माणसाने पण त्यालाही काही प्रमाण असतेच ना. कधी कधी माझी प्रचंड चिडचिड होते अशा वागण्याने.

कधीकधी अधिरपणे वागणे विकोपाला जाऊ शकते तर कधीकधी धीराने वागणे नुकसान करू शकते. मी सहनशक्ती ठेवतो म्हणून सगळं सुरू आहे म्हणणं एकप्रकारची हारच असू शकते कारण प्रेम, भक्ती, चांगुलपणा याठिकाणी अबोलता, धीराने वागणे कधीकधी योग्य ठरत नाही.

काही गोष्टी असतात ज्या व्यक्त वेळेवर झाल्या तर त्याचा उपयोग असतो. वेळ निघून गेली की मग हातातून वाळू निसटून जाते. तर कधी कितीही गरज असली तरी तेथे गप्प।रहाणेच गरजेचे असते तेथे मनाचा सहनशक्ती उपयोगी पडते पण ती इतरांचे हित चिंतून जाते.

आयुष्य म्हणजे महाकाय सागरातली एक प्रवास करणारी होडी असते. सुख दुःखाच्या लाटांवर हेलकावे खात प्रवास करावाच लागतो. मधे रागाचे, लोभाचे वादळ हे येणारचं. त्यात अहंकारा सारखा लचके तोडणारा मासा हल्ला करणारच, शिवाय शांत, निर्मळ असा आनंददायी असणारा किनारा ही लागणारचं पण इथे धीर, अधीरता, स्पष्टता अबोलता या सर्व गोष्टी एका छपराखाली येतात आणि त्याला म्हणतात जगणे. या सर्वांचा जो समतोल राखू शकला तो खरा जगला असे म्हणणे सार्थ ठरेल.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..