नवीन लेखन...

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ…!

जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. […]

संधिवात म्हणजे काय ?

संधीवात म्हणजे सांध्याचे दुखणे. ‘संधिवात’ हे निदान नसूनलक्षण आहे. ज्याप्रमाणे ताप हा मलेरिया, फ्लू अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतो, त्याचप्रमाणे संधिवातदेखील बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत संधिवाताला म्हणतात. (हुमॅटिझम) सांधेदुखी किंवा संधीवात दोन प्रकारचे असतात. १) झिजेचा/घर्षणाचा संधीवात (ऑस्टिओआर्थ्रोयटिस) हा वयोमानानुसार होणारा त्रास आहे. सांधा हा अर्थातच दोन हाडांचा झालेला असतो. या दोन हाडांमध्ये गादी […]

आता

आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या आज थोडे या जगाला विसरु या हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे आज ती हलक्या हातांनी रे पुसू या घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे आज अपुल्याही व्यथेला सावरु या सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी एकमेकांना तरी त्या दाखवू या प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले कोवळेपण जाईचे ते भोगू या खूप जळलो पाहुनी तम भोवती […]

पांढरे शुभ्र दात

हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. खरंतर दातांचा रंग नैसर्गिकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी […]

तुझसा’ नहीं देखा..

शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं.. […]

खोटदुखी (टाचा दुखणे)

बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते. काही काळानंतर ती व्यक्ती न लंगडता चालू शकते; पण टाचांतील दुखणे थोड्याफार प्रमाणात राहते. आपल्या संपूर्ण […]

सुभाषित रत्नांनी – भाग ४

या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात. […]

काश्मीर एक जाणीव – भाग चार

अवंतीपूर ! एके काळची काश्मिरची राजधानी . श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी ! समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक ! कलात्मकता , काव्यात्मकता , कौशल्य , कणखरपणा यांचा अद्वितीय संगम ! राजाधिराज अवंतीवर्मन यांनी आठव्या शतकात वसवलेली अद्वितीय , अप्रतिम राजधानी ! चिनार , देवदार सारख्या दीर्घायुषी वृक्षांची जाणीवपूर्वक केलेली […]

ताकद पैशाची

पैशात मोठी शक्ती असते, ताकद असते. विविध वाक्प्रचारांतून पैशाच्या संदर्भातलं ढळढळीत सत्य ठळकपणे अधोरेखीत होतं. अठराव्या शतकापर्यंत पैसा हा प्रकार वापरात नव्हता. पैशाचा वापर न करता नगाला नग, मालाच्या बदलात माल, सेवेच्या बदल्यात सेवा, मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता अशा प्रकारची वस्तुविनिमय ही  पध्दत बार्टर या नावाने प्रचलीत होती. विनिमयाच्या बार्टर पध्दतीला खूपच मर्यादा होत्या. […]

1 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..