नवीन लेखन...

भारताची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी

भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला. १९ फेब्रवारी २०१८ च्या सकाळी अवनीने गुजरातच्या जामनगर लष्करी हवाई तळावरुन उड्डाण घेतले आणि ही मोहीम यशस्वी केली. एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्या चा मानही तिने मिळवला.

अवनीने या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी तिच्या प्रशिक्षकांनी मिग-21 बायसन विमानाची पूर्णत: पडताळणी केली. उड्डाणादरम्यान लक्ष ठेवण्यासाठी तसेच अवनीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुभवी फ्लायर्स आणि तिचे प्रशिक्षक जामनगर लष्करी तळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि धावपट्टीवर उपिस्थत होते. अवनीने उडविलेले मिग-21 बायसन हे लढाऊ विमान जगातील सर्वाधिक लँडिंग आणि टेक ऑफ स्पीड असणारे विमान आहे.

२०१६ मध्ये अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना या तीन स्त्रियांना प्रथमच वायुसेनेत फायटर पायलट बनण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. तत्पूर्वी ऑक्टोबर २०१५ मध्ये सरकारने स्त्रियांना फायटर पायलट बनण्यासाठीचा मार्ग मोकळा करुन दिला होता. ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तान यासारख्या जगातील निवडक देशामंध्येच स्त्रिया फायटर पायलट बनू शकतात.

एखादे लढाऊ विमान एकट्याने उडविणे हे पूर्णत: एक फायटर पायलट बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल असते. अवनीने यशस्वीरीत्या हे पहिले पाऊल उचलले असून या क्षेत्रात येऊ इच्छिणार्याह तिच्यासारख्याच महत्त्वाकांक्षी महिलांसाठी एक नवे अवकाशच निर्माण करुन दिले आहे. मध्य प्रदेशच्या शहडोलची येथील अवनी चतुर्वेदीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी दिनकर चतुर्वेदी ह्यांच्या घरी झाला.

तिने तिचे प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केलं. १० वी आणि १२ ह्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांत अवनी आपल्या शाळेतून पहिली आली होती. यानंतर राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून त्यांनी बीटेक पर्यंतचे शिक्षण घेतले.

भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या अवनी या ही महिला असून, जून २०१६ मध्ये अवनी आणि भावना कंठ, मोहना सिंह यांना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ स्क्वाड्रनमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले होते. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याद्वारे त्यांना कमिशनमध्ये नेमण्यात आले होते.
त्याआधीपर्यंत भारतीय वायुसेनेत महिलांना फायटर विमान चालविण्याची परवानगी नव्हती. निवडीनंतर पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एअरफोर्समध्ये जाण्याच्या निर्णयाबाबत खुलासा केला.

अवनी सोबत ऑफिसर भावना कांत आणि ऑफिसर मोहना सिंह ह्यांची निवड करण्यात आली होती.

निवड झाल्याच्या एका वर्षापर्यंत ह्या तिघींनाही फायटर पायलट म्हणजेच लढाऊ वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात आले.

अवनीने गुजरातच्या जामनगरमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. यापूर्वी देखील अवनी महिला फायटर प्लेन चालवत असे. मात्र, त्यावेळी तिच्या मदतीला नेहेमी पुरुष कर्मचारी असायाचे.

अवनीचे वडील म्हणजेच दिनकर चतुर्वेदी हे देखील स्वतः एक इंजिनीअर आहेत. त्यांची आई गृहिणी आहे. तर मोठा भाऊ हा भारतीय सेनेत रुजू आहे.
पण भाऊ सेनेत असल्याने तिने एका सैनिकाचे जीवन जवळून अनुभवले आहे, तेव्हापासूनच तिच्यात देशभक्ती जागृत झाली असावी. कल्पना चावला ह्या तिच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत ठरल्या.२००३ साली जेव्हा कल्पना चावला ह्यांच्या अंतराळ यानाचा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा अवनी खूप दुःखी झाली. पुढे चालून यालाच तिने आपल्या जीवनाचे प्रेरणास्त्रोत बनवले.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अवनीने एयरफोर्सच्या टेक्निकल सर्विसमध्ये रुजू होण्यासाठी परीक्षा दिली. ती परीक्षा उत्तीर्णही झाली. ह्यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले होते.

त्यानंतर ती फायटर पायलट बनली. पण जर तिला वायुदलात ग्राउंड जॉब मिळाला असता तर तिने तत्काळ राजीनामा दिला असता असेही एका मुलाखतीत तिने सांगितले. कारण तिचे ध्येय हे आकाशात झेप घेण्याचे होते.

जसे अवनीसाठी कल्पना चावला ह्या प्रेरणास्थान ठरल्या तश्याच आज भारतीय महिलांसाठी अवनी चतुर्वेदी ही एक प्रेरणास्थान बनली आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..