नवीन लेखन...

खोटदुखी (टाचा दुखणे)

बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते. काही काळानंतर ती व्यक्ती न लंगडता चालू शकते; पण टाचांतील दुखणे थोड्याफार प्रमाणात राहते. आपल्या संपूर्ण शरीराचे वजन टाचांवर सतत पडत असल्याने टाचांवर वजन घेणाऱ्या कॅलकेनियम या हाडांच्या टोकांवर फार मोठा ताण पडतो. त्या जागी जोडलेल्या पायाच्या बोटांना हलविणाऱ्या स्नायूंच्या उगमस्थानाला किंवा तेथे जोडलेल्या तळव्यातील प्रावरणीला इजा होते व रुग्णाला दुखू लागते. काही वेळा तेथील हाड वाढले आहे, अशी समजूत होते; परंतु ९९ टक्के रुग्णांत ही परिस्थिती नसते. बऱ्याच वेळा वजन वाढल्याने अथवा वयोमानानुसार पोटरीच्या भागातील स्नायूंची शक्ती कमी होते.

पायाचा आकार बदलतो व पाय अधिक सपाट होतात. फ्लॅट फीट. अधिक टाचांच्या हाडांच्या टोकावर ताण येऊन स्नायूंच्या उगमाजवळ इजा होते व टाच दुखू लागते. औषधे देऊन हे दुखणे कमी केले जाते. कधी कधी गरम व थंड पाण्याचा एकामागोमाग शेक केल्यानेही हे दुखणे कमी होते. पायाच्या चपलेत किंवा बुटात मऊ सिलिकॉन किंवा पायाच्या ‘आरचिस’ना आधार देणारा सोल घातल्यासही (आर्च सपोर्ट सोल) रुग्णाला बरे वाटते. फिजिओथेरपिस्ट अल्ट्रासोनिक उपचार देऊन काही अंशी दुखणे कमी करतात. काही वेळा हायड्रो कॉर्टिझोनची इंजेक्शन्स देऊन रुग्णाचे दुखणे कमी करता येते. वजन कमी करणे, टाचांवर भार देऊन सतत न उभे राहणे, मऊ सिलिकॉन पॅड वापरणे, तसेच पोटऱ्यांच्या स्नायूंचे व्यायाम करून त्यांची शक्ती वाढविणे हे योग्य. नपेक्षा हे दुखणे पुनः पुन्हा उद्भवते.
फारच क्वचित या दुखण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. इतरही अनेक कारणांनी टाचेच्या आजूबाजूला दुखू शकते. याचे योग्य निदान करून योग्य ती उपाययोजना करता येते.

डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..