नवीन लेखन...

जाणिव

एका सूनबाईने सासूबाईंना. पगार वाढ झाली आहे म्हणून फोन करून सांगितले. आणि सासूबाईंनी अभिनंदन केले. पण ईथेच संपले नाही खरा भाग वेगळाच कारण सून बाईंनी याच श्रेय सासूबाईंना दिले नातवाला सांभाळले होतेम्हणून ती नोकरी करु शकली व बढती मिळाली यावर काही तरी सांगायच आहे मला. […]

ब्रह्मगिरी फार उंच पर्वत

वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये मी पंधरा दिवस फिरायला जात असतो. 35 वर्ष रेल्वे त नोकरी केली कुठे सुद्धा फिरता आले नाही रेल्वेची ड्युटी बारा तासाची फक्त मला एक फायदा झाला तो म्हणजे वाचन आणि लेखन. ड्युटी बरोबरच वाचन-लेखन असल्यामुळे माझा वेळ कधी जात होता हे मला समज त सुद्धा नव्हते इतका मी वाचनात आणि लेखनात रंगून गेलो होतो. […]

‘वाचेल’ना वाचन?

पुणे हे एके काळचं विद्येचं माहेरघर. त्या काळात सर्वत्र विद्वता नांदत होती. शहरातील मुख्य पेठांमध्ये, डेक्कनला व कॅम्पमध्ये पुस्तकांची मोठी दुकाने दिमाखात उभी होती. या ज्ञानमंदिरांना मी अनेकदा भेटी दिलेल्या आहेत. टिळक रोडवरील नीळकंठ प्रकाशनचं छोटंसं दुकान जातायेता लक्ष वेधून घ्यायचं ते त्या दुकानाच्या पाटीवरील बोधवाक्यामुळे “शब्दकोशातील शब्द येथे सुंदर होऊन भेटतात.’ बरीच वर्षं चालू असलेलं […]

लहान वयातील कोपराजवळील अस्थिभंग

कोवळ्या वयात लहान मुले पडल्यावर कोपराजवळ अस्थिभंग होणे हे अगदी नेहमीचे आहे. कोपराजवळ सांध्याच्या एक इंचावर हे हाड खूप पातळ असल्यामुळे ते सहजच तुटते. क्ष-किरणाने याचे निदान होते; परंतु त्याच वेळी आसपासच्या रक्तवाहिन्यांना इजा झाली असल्यास ते पडताळून पाहावे लागते. पूर्वी या अस्थिभंगाची योग्य उपाययोजना न झाल्याने हात कोपराजवळ वाकडा वाढत असे. कोपराला मालिश केल्याने जरी […]

देह

देह – बाळपणीचा सुखावणारा मातापित्यांना घरच्यांना दारच्यांनाही मऊ, रेशिमस्पर्शी पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा.. देह – यौवनातला …सुखवणारा इतरांना….स्वत:लाही रेशिमस्पर्शी सुख देणारा भोगणारा भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा गर्वोन्नत – टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा… देह – मावळतीचा काहीच न सोसणारा दुःखच नव्हे तर सुखही… जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा.. मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना देहावाचून अर्थ नाही तरीही तुझ्या-माझ्यात असावं देहापलिकडचं काही हातात घेतलेले […]

हास्यबँक (बँकेतील गंमती-जमती)

मी एकदा ठाणे पश्चिम शाखेच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत असताना एक विनोदी प्रसंग घडलेला आज ही आठवतो. तेव्हा टोकन नंबर दर्शवणारा बोर्ड बँकेत नव्हता. बहुदा कॅशियर टोकनचा किंवा नावाचा पुकारा करीत. तेव्हा आमच्याकडे डेक्कन लॉजचे खाते होते. बहुतेक ते लोक एक दिवसाआड पैसे काढायला येत. […]

कोपराचा सांधा

या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे. हे ढोलक्याकृती मुसळ अलना […]

तोंडाच्या स्वच्छतेसाठी माउथवॉश

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दुर्गंधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या हिरड्यांचा समस्या, जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी शकते. अशा येऊ व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यतः तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला […]

मनगटाजवळील नस दबणे

हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात. काही कारणाने या बोगद्याची खोली कमी झाली तर ही मीडियन चेता दाबली जाते […]

खंत

इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये? शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी गोष्ट अर्धी राहून जाईल […]

1 7 8 9 10 11 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..