नवीन लेखन...

लहान वयातील कोपराजवळील अस्थिभंग

कोवळ्या वयात लहान मुले पडल्यावर कोपराजवळ अस्थिभंग होणे हे अगदी नेहमीचे आहे. कोपराजवळ सांध्याच्या एक इंचावर हे हाड खूप पातळ असल्यामुळे ते सहजच तुटते.

क्ष-किरणाने याचे निदान होते; परंतु त्याच वेळी आसपासच्या रक्तवाहिन्यांना इजा झाली असल्यास ते पडताळून पाहावे लागते. पूर्वी या अस्थिभंगाची योग्य उपाययोजना न झाल्याने हात कोपराजवळ वाकडा वाढत असे. कोपराला मालिश केल्याने जरी हाड तुटलेले दिसत नसले तरीही १५ दिवसांसाठी हा कोपर प्लास्टरमध्ये बांधावा लागतो. अशामुळे कोपराच्या सांध्याला विश्रांती मिळते व पुढे तो चांगला व्यवस्थित होतो. कोपराजवळ हाड तुटल्यानंतर योग्य उपाययोजना न केल्यास काही महिन्यातच तो वाकडा दिसू लागतो. मुलांच्या होणाऱ्या वाढीमुळे तो अधिकाअधिक वाकडा वाढत जातो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून तो पुन्हा सरळ करावा लागतो. सुजलेल्या कोपराला मालिश केल्याने तो कायमचा कडक होतो.

कोपराजवळच्या रक्तवाहिन्यांवर दांब येऊन वेळेवर उपाययोजना न झाल्यास पुढील संपूर्ण हात कायमचा सुकून जाणे व्होकमनस इश्चिमिक कॉन्ट्रॅक्चर) असे अतिभयंकर प्रकार होऊ शकतात. कोपराच्या आतील भागाजवळचे हाड व्यवस्थित न जुळल्यास तेथे असलेल्या महत्त्वाच्या अल्ररनर्वला इजा होऊ शकते. कारण कोपराच्या प्रत्येक हालचालींमुळे ही चेता पुढे मागे हलते व ती या खरखरीत हाडावर घासली जाते. तिची क्षमता कमी होते व हातातील बोटांच्या महत्त्वाच्या हालचाली कायमच्या नष्ट होऊ शकतात. एकूण लहान मुलांत कोपराचा अस्थिभंग ही साधी बाब नाही हे लक्षात असावे.

डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..