नवीन लेखन...

हास्यबँक (बँकेतील गंमती-जमती)

मी एकदा ठाणे पश्चिम शाखेच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत असताना एक विनोदी प्रसंग घडलेला आज ही आठवतो. तेव्हा टोकन नंबर दर्शवणारा बोर्ड बँकेत नव्हता. बहुदा कॅशियर टोकनचा किंवा नावाचा पुकारा करीत. तेव्हा आमच्याकडे डेक्कन लॉजचे खाते होते. बहुतेक ते लोक एक दिवसाआड पैसे काढायला येत. त्या वेळी एक अगदी नवा कॅशियर पैसे द्यायला बसला होता. टोकन पुकारून कोणीच न आल्याने त्याने नावाने हाक मारायला सुरुवात केली. खरे तर चेकवर  नाव स्टॅम्प/छापलेले असते.

पण नेमके त्या चेकवर स्टॅम्प नसल्याने त्याने हातानेच इंग्रजीत Deccan lodge  असे लिहिले होते. कॅशिअरने हाक मारली… डेक्कन लोडगे! डेक्कन लोडगे!! लोडगे कशाला येईल? नंतर, कोणालातरी घोळ लक्षात आल्यावर हे लोडगे नाही, लॉज आहे हे सांगितल्यावर सगळेच हसू लागले. गंमत म्हणजे तेव्हापासून त्यांचे नाव लोडगे पडले ते पडलेच!

—-****—-

आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी फेक किंवा खोट्या नोटा चलनात यायला लागल्या होत्या. रोखपालांसाठी तो एक वाईट काळ होता. कारण त्या इतक्या हुबेहूब असत की चालू खाते असणारे व रोजच रोखीचे व्यवहार करणारे पण कधी कधी फसून अशा नोटा भरायला बँकेत येत. बँकेच्या नियमाप्रमाणे खोटी नोट लगेच फाडून टाकल्याने नाराज होत. एकदा असाच एकजण गर्दीत बँकेत आला व जवळच्या नोटांची थप्पी बँकेत भरायची आहे असे म्हणू लागला. रोखपलाने त्याला स्लीप भरायला सांगितल्यावर म्हणाला की, ‘मला खऱ्या-खोट्या नोटा समजत नाहीत. त्यामुळे तुम्ही आधी चेक करून घ्या.’ गर्दी ओसरल्यावर वेळ संपता संपता तो रोखपालासमोर उभा राहिला. रोखपलाने नोटा घेऊन शांतपणे चेक केल्या. खरोखरच एक मोठी नोट खोटी असल्याने व हा माणूस नवा वाटल्याने त्याने खाते नंबर विचारला व ती नोट फाडून स्टॅम्प मारून त्याला दिली. त्यावर तो जे म्हणाला ते ऐकून हसावे की रडावे हेच आम्हाला कळेना!

‘साहेब, माझे खाते इथे नाही. माझा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. परवा पण शंभराची नोट खोटी निघाली तर बँकवाले ओरडले. तुमची बँक जवळ आहे म्हणून चेक करायला आलो.’ थोडक्यात फुकट काम करवून तो गेला.

—-****—-

मी एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला असताना रोजच्या व्यवहारात कधी कधी अतिशय गंमतीचे प्रसंग यायचे आणि त्यामुळे साहजिकच बँकतले तणावाचे वातावरण निवळे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पसरे. एकदा एक नवीन लग्न झालेली नवतरुणी बँकेत आली. आम्ही सगळे तिला ओळखत होते. लग्न झाल्याने ती त्या वेळेच्या रिवाजाप्रमाणे सुंदर साडी नेसून, नवे कोरे मंगळसूत्र घालून नटून थटून आली होती. पैसे काढण्यासाठी तिने पासबुक काढून, स्लीप भरली आणि खाली सौ. Xxxx अशी नव्या नावाने झोकदार सही केली. ऑफीसरने तिला बोलावून सांगितले, ‘तू ही सही आत्ता करू शकत नाहीस. त्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण करून नाव बदलावे लागेल. तोपर्यंत तुला पूर्वीची कु. xxxx अशीच सही करावी लागेल.’ तिने ते मान्य केले. मात्र कु. लिहिताना ती नाराज झाली आणि तिने ते बोलून दाखवल्याने, ती गेल्यावर सगळे हसू लागले. खूप स्त्रिया जरुरी नसताना सही बरोबर, सौ.कु. अशी सुरुवात करतात आणि ते बदलताना त्यांचे मन धजत नाही. त्याकाळी सौ. लिहिणारी एक स्त्री अशीच पती निधनानंतर बँकेत आली ते सही बदलण्यासाठी. ती आठवण पण हृद होती.

-अंजली कोनकर

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..