नवीन लेखन...

पिंजर – फाळणीची नकाशावरील भळाळती जखम !

आख्खा ” पिंजर” फाळणीमुळे रक्तरंजित !  फक्त असंवेदनाशील व्यक्तीच डोळ्यांत पाणी न आणता आणि हाताच्या मुठी आवळल्याविना एका बैठकीत पिंजर बघू शकेल. १९४७ ची जखम माझ्या पिढीने पाहिली नाही पण अमृता आणि गुलज़ार ती आम्हाला विसरू देत नाही. या रचनेत अमृता साक्षात वारीस शाहला ( हीर रांझा या सुप्रसिद्ध प्रेम त्रिकोणाचा अक्षर निर्माता ) आवाहन करते आहे […]

जीवन मार्गातील अडसर

जीवनातील वाटे वरती,  कडेकडेने उभे ठाकले परि वाटसरूंना सारे ते,  यशातील अडसर वाटले…१, वाट चालतां क्रमाक्रमानें,  बाधा आणून वेग रोकती ध्येयावरल्या उच्च स्थळीं,  पोहचण्या आडकाठी करिती…२, षडरिपूचे टप्पे असूनी,  भावनेवर आघांत होतो सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो…३, पवित्र निर्मळ भावनेमध्ये,  रंगाच्या त्या छटा उमटती गढूळपणाच्या वातावरणीं,  सारे कांहीं गमवूनी बसती….४, थोडे राहता गाफील तुम्ही,  जाळ्यामध्ये […]

मराठी भाषा आणि लिपी समृध्दी

या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३३

भगवान श्रीविष्णूंना सहस्रबाहू असे म्हटले जाते. सामान्य अवस्थेत जरी भगवान चतुर्भुज दिसत असलेले तरी आवश्यकतेनुसार ते आपल्या हजारो हातांना प्रगट करतात. त्यावेळी ते आपल्या हातात अनेक आयुधे धारण करतात. त्या सगळ्यांच्या सह भगवंताच्या बाहूंचे वैभव आचार्यश्रींनी या श्लोकाचा स्पष्ट केले आहे. […]

मी मुंबईची लोकल बोलतेय

आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे. […]

लोकशाहीच्या नावाने चांगभलं…!!

मतदान हा लोकशाहीचा उत्सव… चार दिवसांचा… त्या साठी आपले गावातील संबंध खराब करु नयेत, कर्ज काढून खर्च करू नये… हे सांगण्याचा प्रयत्न…. `आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप’चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना गावोगावी वेशीवर लोकशाहीचा नगारा गल्लीच्या कुशीवर भाऊबंदकी नजारा… जातीपातीची वाटणी गोळाबेरीज मांडली गावएकीची चटणी सत्तेपायी वाटली… गोंधळ जागवला स्वार्थी कुरघोडीने अख्खा गाव नागवला रात्री अफाट […]

सांगतो वडिलांची कीर्ती

सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत . […]

सूर्याला प्रदक्षिणा

मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते. […]

 नाम घेण्याची वृत्ती दे

सतत नाम घेण्यासाठीं,  बुद्धी दे रे मजला आठवण तुझी ठेवण्याची,  वृत्ती दे रे मनाला ……।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी,  अस्तित्व तुझेच जाणी श्वास घेण्याची शक्ती,  तुझ्याचमुळे असती जीवनातील चैतन्य,  तुजमुळेच मिळते सर्वांना…..१ सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला   अन्नामधले जीवन सत्व,  तूच ते महान तत्व सुंदर अशी सृष्टी,  बघण्या ते दिली दृष्टी आस्वाद घेण्या जगताचा, […]

‘फुटपाथ’

फटाके उडवून चार वर्षे तरी झाली होती आता त्याला. पण वडील गेल्यावर चाचाबरोबर कामासाठी तो मुंबईला आला आणि त्याचं बालपण संपलं. जबाबदारीच्या ओझ्याखाली चिरडलेल्या त्याच्या बालसुलभ भावना, त्या रात्री उडणा-या त्या फटाक्यांमधे कुठेतरी त्याचे हरवलेले बालपण शोधत होत्या…
त्याने वळून बाजूला झोपलेल्या आपल्या चाचाकडे पाहिले.. […]

1 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..