नवीन लेखन...

संकल्प

सांगायचा मुद्दा हाच की आपल्याला झेपेल,आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असेच संकल्प केले पाहिजेत.आणि ठाम निश्चयाने वर्षभर त्याची कास न सोडता ते पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न शर्थीने केले पाहिजे. नाहीतर नवे वर्ष नवे संकल्प हे कोड कधीच सुटणार नाही. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३२

भगवंताच्या गळ्यातील वैजयंतीमाला चे वर्णन केल्यानंतर ती माला ज्या विशाल खांद्यांवर आधारलेली आहे त्या भगवंताच्या खांद्यांचे वर्णन करतांना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात, […]

भिडे वाडा

भिडे वाडा साक्ष देतो शिक्षणाची महती गातो सावित्रिने वसा घेतला ज्ञानदान यज्ञ पेटला अन्यायाला तोंड दिले साक्षरतेचे द्वार खुले रात्र शाळा मुलींची शाळा शिकविण्याचा तिला लळा ज्ञान ज्योती क्रांती ज्योती ज्योतिबांची तेजस्वी मुर्ती घडविला इतिहास साक्षरतेचा नवा प्रवास निर्भय,निडर ज्ञान फुला अभिवादन करते तुला सौ.माणीक शुरजोशी. नाशिक. भिडे वाडा साक्ष देतो शिक्षणाची महती गातो सावित्रिने वसा […]

किचन गुरु!

माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो. […]

जीवनावर प्रभाव टाकणारे चार घटक

आज आपण आपले जीवन उदात्त बनवण्याच्या चार मौल्यवान घटकांवर विचार करूया. हे घटक आपल्या नियतीला दिव्यत्वाच्या मार्गावर खचितच नेतील. त्याच्या पूर्तीसाठीच हा मानवी जन्म आपणांस बहाल करण्यात आला आहे. पृथ्वीवरील मानवाच्या आगमनामागचे जे ज्ञात पैलू आहेत- ज्ञान, आकलन, बुद्धिमत्ता, समज, परिपक्वता, ते सारे साध्य होण्यासाठी हे चार घटक महत्वाचे ठरतात. हा “आत्मज्ञानाचा ” मार्ग आहे. […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे  । आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे  ।। जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे  । मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले  ।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस  । जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते  ।। गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे  । नभास भिडता सुरताना, शब्द […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३१

भगवान श्रीविष्णुच्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हाचे आणि कौस्तुभ मण्याचे सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची दृष्टी तेथे असणाऱ्या अत्यंतिक वैभवसंपन्न अशा वैजयंती माले कडे जाते. त्या अम्लान अर्थात कधीही न कोमेजनाऱ्या माळेचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]

प्रल्हाद!

गोष्ट  जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी ‘आमची’ नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी ‘पासबुक रायटर’ म्हणून टेम्पररी(आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. […]

हट्टी अनु

एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

1 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..