नवीन लेखन...

जीवन मार्गातील अडसर

जीवनातील वाटे वरती,  कडेकडेने उभे ठाकले

परि वाटसरूंना सारे ते,  यशातील अडसर वाटले…१,

वाट चालतां क्रमाक्रमानें,  बाधा आणून वेग रोकती

ध्येयावरल्या उच्च स्थळीं,  पोहचण्या आडकाठी करिती…२,

षडरिपूचे टप्पे असूनी,  भावनेवर आघांत होतो

सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो…३,

पवित्र निर्मळ भावनेमध्ये,  रंगाच्या त्या छटा उमटती

गढूळपणाच्या वातावरणीं,  सारे कांहीं गमवूनी बसती….४,

थोडे राहता गाफील तुम्ही,  जाळ्यामध्ये अडकून जातां

जीवनाचे जे साध्य असते,  स्वकर्माने गमवून बसतां…५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2022 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..