पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे

१६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महा मुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे ‘हिराॅईन्स’चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली. मुंबईच्या अशा दोन […]

कथा विश्वव्यापी दीपस्तंभाची – गोष्ट हेलेन केलरची…

  कल्पना करा की तुम्ही अंध आहात, मुके आहात आणि बहिरेही आहात. तुमचे वय जेमतेम दोनेक वर्षे आहे आणि तुम्ही त्या अंधारया आणि आवाजांच्या संवेदना नसलेल्या जगात लहानाचे मोठे होत आहात. मग तुमच्या मनात नैराश्य येईल की हिमशिखरे खुजे ठरतील इतके उत्तुंग विचार येतील ? स्वतःबद्दल काय विचार येतील ? हातपाय धडधाकट असूनही आपल्या नशिबाला दोष देणारी […]

मराठी चित्रपटसृष्टी – आता प्रतिक्षा ‘प्रेक्षकांच्या’ पुरस्काराची

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आणि मराठी चित्रपटजगतात कौतुकाचे, अभिनंदनाचे उधाण भरते आले. प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद वाटणे साहजिक आहे कारण ही घटना साधी नाही. मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची ही पाचवी वेळ आहे. […]

हरवलेले दिवस

आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे […]

ए लेटर टू विनोद खन्ना…

प्रिय विनोद, सोशल मीडियात आणि वृत्तवाहिन्यांवर तुझे व्हायरल झालेले फोटो पाहिले आणि काही क्षणासाठी विचलित झालो. तू फाईटर आहेस, तुला जे काही झालं असेल त्यातून तू बाहेर पडशील याची अनेकांना खात्री आहे. तुझ्या लाखो चाहत्यापैकीच एक मी. बॉलीवूडी चित्रपटात तू एकमेव तगडा अभिनेता असावास जो मिशीतदेखील हँडसम वाटायचा आणि सफाचट ओठांच्या लुक्समध्येही देखणा दिसायचास. तुला तुझी […]

कथा सुरेखा पुणेकरांची …

जीवावर उदार होऊन उसनवारी करून किडूक मिडूक विकून एखाद्या स्त्रीने धाडस केलं आणि सुरुवातीच्या पहिल्याच घासाला दात पडतील असा खडा लागला तर तिची अवस्था अत्यंतबिकट होते. लावणीसम्राज्ञी  सुरेखा पुणेकरांच्या सुरुवातीच्या हलाखीच्या दिवसाच्या आठवणींची कथा … एक काळ होता जेंव्हा तमाशाचा फड बैलगाडीतून गावोगाव फिरत राहायचा आणि आपल्या कौशल्याच्या जीवावर नावलौकिक कमवायचा. अगदी शांतारामबापूंच्या ‘पिंजरा’त देखील अशीच दृश्ये […]

गोविंदराव तळवलकर

कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय. मला समजायला लागल्यापासून पेपर वाचणं हा माझा छंद. आज वयाच्या ५१ व्या वर्षीही पेपर वाचल्याशिवाय दिवसाची […]

राजा केळकर संग्रहालय

पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. […]

माझी माय मराठी !

काल परवा कुणीतरी मराठी भाषा मरणाच्या उंबरठ्यावर…… मराठी मराठी करणारांच्या नाकाला मिरच्या झोम्बाव्यात असे वादग्रस्त विधान करून खरं तर मराठीविषयी परखड  मत मांडले. आपल्याला मराठी सही करण्याची देखील लाज वाटणारांनी मराठी भाषा अस्तित्वात राखण्याऐवजी व्यवहारशून्य भाषा अशी अवहेलना करण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे. महाराष्ट्र शासन व्यवस्था इंग्रजीच्या आहारी गेलेली आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीची यादी इंग्रजीतून प्रसिध्द […]

1 2 3 20