ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी प्रभूसी मी विनविले  ।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे घेण्यास ते समजून  ।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते वस्तूच्या त्या गुणापरी  ।। सारे सजिव निर्जिव वस्तू गुरू सारखे वाटावे तेच आहेत ईश्वरमय तुम्हीच ते […]

आत्मविश्वास

जे जे मजला हवेच होते, मिळवित गेलो यत्न करूनी, चालत असता जेव्हा पडलो, उठलो होतो धीर धरूनी ।।१।। आतंरिक ती शक्ती माझी, पुन्हा पुन्हा तो मार्ग दाखवी, शरिराला ती जोम देवूनी, वाटेवरती चालत ठेवी ।।२।। निराश मन हे कंपीत राही, विश्वालासा तडे देवूनी, दु:ख भावना उचंबळता, देह जाई तेथे हादरूनी ।।३।। परि विवेक हा जागृत होता, […]

डाग!

कितीही देशी शीतल चांदणे आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी डाग एक तो […]

तृप्ती आणि समाधान

तृप्ती व समाधानात धुसर रेषा समाधानात तृप्ती का तृप्तीत समाधान ! तृप्ती व समाधान जीवनाच्या गाडीची दोन चाके एक चालते दुसरे डुगडुगते ! समाधानाच्या वाटेवर अतृप्तीचे काटे तृप्तीच्या युक्तीने एकही न रुते ! तोच खरा मार्ग समाधानाने तृप होतो तृप्तता मिळूनही समाधान होत नाही त्याचा मार्ग चुकतो ! समाधानाच्या पाठी धावताना तृप्ती दिसेनाशी होते समाधानातून तृप्ती […]

खिडक्या दोन जीर्ण !

इमारतीचा झाला आहे आता खंडहर, अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण, एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला, आहे का कोणी आपली काळजी घ्यायला? काळ चालला आहे वेगात, न थांबता, न संपता, बिचाऱ्या पाहत होत्या वाट आपल्या ‘कांती’ बदलाची ! ओसरला त्यांचा आनंद क्षणात, आले होते कोणी इमारत पाडण्या, काही होत्या सुपात काही जात्यात, बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत ! […]

मन झाले फुलपाखरू

मन झाले फुलपाखरू मन झाले फुलपाखरू जीवन जगताना गती स्वैर किती मनाचा ठाव कोणा किती? असते आपल्याच खुशीत मनाचा लपंडाव कोणा कळला? मन भरून राहिला कोपरा देत राहिला ठोकरा मन मनाच्या साखळ्या गुंतता गुंती गुंता सोडविण्या त्या सगळ्या हैराण जीव पुरता मन मनाचा मोठा गुंता गुंता तुटता ना सूटता मन मनाचे द्वैत भांडते आतल्या आत होण्या […]

अमेरिकेतील नवागत-नातवास

 नवागता, बाळा, तुज बघुनी आनंदानें भरली कावड मरुस्थला भिजवी श्रावणझड . – नवागता, नवकिरण भास्कराचा शुभंकरा, तूं कळस मंदिराचा आशीष तिथें देई प्रशांत-उदधी देइ इकडुनी आशीर्वच हिमनिधी . – प्रशांत–उदधी : Pacific Ocean हिमनिधी – हिमालय – बाळा, ‘उद्या’ची आशा तूं ही समजशील कां भाषा तूं ? एकच भाषा येते तुज  – ‘रुदन’ त्यानें प्रमुदित ‘काल’-‘उद्या’चे […]

प्रदूषण (४) – पूर्वी आणि आता – गंगाजळ

दोन थेंब गंगाजळ मृत्युच्या दारी स्वर्गाचे तिकीट रोज पी गंगाजळ त्वरित मिळेल स्वर्गाचे तिकीट. टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.

1 2 3 160