शैक्षणिक

गाथा यशाची, वैभववाडीतील सुपुत्राची…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले. […]

शिवराय हे निधर्मी राज्यकर्ते होते !

अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी स्वतः शिवरायांनी घेतली आणि राजगडावर व प्रतापगडावर अफजलखानाची कबर स्वराज्याच्या खर्चाने बांधली. शिवरायांचा लढा हा धार्मिक नव्हता. मानवतावादी होता. […]

इंडिया, भारत आणि हिंदुस्थान

आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोकं
[…]

सधन असताना आरक्षण मागणे हे लाचारीच

आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. […]

गाढव कायदा आता मानव होऊ द्या !

मी कायद्याचा जाणकार नाही. परंतू जे नजरेला दिसलं, त्यावरून मला हे लिहावसं वाटलं. माणसं, माणसं असताना कायदा गाढव होता हे ठिक आहे. पण आता माणसं गाढवासारखी वागू लागल्यावर, कायद्याने आता माणसासारखं वागायला हरकत नसावी, एवढंच मला सुचवायचं आहे..!! […]

कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी

शेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का? […]

बालभारतीचा इतिहास पुस्तक आणि फिल्मच्या रूपात

राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. […]

देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !! […]

रमी

पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते. […]

1 2 3 34