काहीं नविन करायचे असलें किं मुहूर्त काढला जातो त्यात काहीं वावगें नाहीं ज्याचा त्याचा श्रध्देचा विषय आहें. अगदी लहानपणी मनात कोरली गेलेली घटना म्हणजे, आमच्या घरासमोर एका मिठाई दुकानाचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला होता. पण नंतर काहीं वेळात दुकानाला काहीं कारणाने आग लागली. नशिबाचा भाग असा किं जीवीत हानी काहीं झाली नाही.
योगा योगाचा भाग असा किं हें मिठाईचे दुकान पुढे व्यवस्थित चांगले चालले.अजुनही सुरु आहें. मी जेंव्हा बाहेंर प्रवासाचे नियोजन करतो तेंव्हा सीझन वा हंगाम नसलेलाच काळ निवडतो. यात्रेचे दिवस टाळतो. हेतु हा किं गर्दीचा त्रास नको.निवांतपणा मिळावा . प्रवासांत सहकारीही समंजस भेटतात असा अनुभव आहें. धार्मिक स्थळांस जाताना हिच पध्दत वापरतो. प्रवास व सहल एकदम छान होतें. एका शास्त्रज्ञाने सांगितलेला अनुभव असा किं तें मोठी खरेंदी चांगले दिवस वगळुन इतर दिवशीच करतात.
त्यांनी एक आलिशान मोटार खरेंदी पितृपक्षात केली आहें असाही अनुभव त्यांनी सांगितला.आजतागायत पितृपक्षात खरेदीं केलेली मोटार विना अपघात व्यवस्थित सुरु आहें. असें हें मुहुर्ताचे गौडबंगाल. म्हणुनच मुहुर्त कधीच बघु नका ? आपण नीट आहोत ? जीवंत आहोत ? या पेक्षा शुभ मुहुर्त कोणता असु शकतो ?
इति लेखन सीमा,
अनिल भट, नमस्तें.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक अनिल भट ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply