दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

वैश्विक नातं

आपल्याला मिळालेली नाती हि अनमोल देणगी असते. हि नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. […]

मन कि बात – व्यसनं आणि सरकार..

प्रत्येक बजेटमधे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, एक गोष्ट काॅमन असते आणि ती म्हणजे दारू-बिडी-सिगारेट (हानीकारकच परंतू ड्रग्सच्या तुलनेत कमी हानीकारक) आदी गोष्टींवरची करवाढ. या करवाढीमुळे सहाजीकच या गोष्टींच्या किंमती वाढतात. अशा किंमती वाढवल्याने लोक व्यसनांपासून दूर राहातील किंवा जातील असा शेख महंमदी विचार सरकार करत असणार. शेवटी सरकारचं मुख्य कर्तव्य ‘लोककल्याण’ हे असतं असं कालेजात असताना […]

वेश्या व राजकारणी

दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात. खरं तर वेश्या आणि राजकारणी यांची तुलना करून मी वेश्यांचा अपमान करतोय याची मला जाणीव आहे. वेश्या -बळजबरीने वा नाईलाजाने- एकदा […]

आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार ?

निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं. परंतू नागरीकांना काय हवंय याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही, करतानाही दिसत नाही..! प्रत्येक वाॅर्ड मुंबईचाच हिस्सा असला तरी प्रत्येक वाॅर्डाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, असतात. एखाद्या वाॅर्डच्या गरजा काय आहेत हे […]

कावळा …

माळावरच्या ओसाड दुनियेत भकासलेली उनाड पाखरं भिरभिरतात, तेंव्हा पायाखालचं अस्ताव्यस्त अरबट चरबट तणसुद्धा मखमली वाटतं गुरांच्या कळपापाशी उभारता डोक्यातलं जित्राबसुद्धा कान टवकारतं. वठलेल्या झाडावरची साल आपल्याच अंगावरून सोलून काढल्यासारखी वाटते, खुनशी वारा पाचोळ्यांचे रकाने हवेत भरत, रोंरावत राहतो, चिलबटलेल्या पोराबाळांच्या डोळ्यातील स्वप्नेही त्यातून सुटत नाहीत, तेंव्हा त्याच्या वावटळीवर स्वार होऊन सटवाईला भेटावंसं वाटतं. रखरखत्या उन्हाची सहस्त्रावधी […]

देवा, आम्हाला कायम दु:खात ठेव..

आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा […]

आनंद: एक वाटणं आणि वाटणं..

मन की बात.. “प्रत्येकाला आपण आनंदात असावं असं वाटणं हा मनुष्यस्वभाव झाला व आपल्यासारखंच इतरांनीही आमंदात असावं असं वाटण ही माणुसकी झाली..” हे पुलंचं ‘पाचामुखी’ या पुस्तकातलं वाक्य. किती गहन अर्थ भरलाय या वाक्यात..! पण होतं काय, की आपण ते वाचतो, पांच मिनिटं भारावल्यासारखं होतो आणि पुन्हा मी, माझं सुरू करतो.. सर्व आनंदी राहावेत असं सांगणारे […]

मन की बात – DNA व Dna

DNA ( Deoxyribo Nucleic Acid). डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे हे घडतं. शाळेत असताना कधीतरी उत्तरापुरती घोकंपट्टी केलेली ही माहिती. कोणत्याही […]

1 2 3 7